ब्रेकिंग न्यूज.. राज्य सरकारने दुधाचे अनुदान ताबडतोब पशुपालकांच्या खात्यात जमा करावे -डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सध्या बहुतांश भागातील शेतकरी हे शेतीबरोबरीने दुध व्यवसायाकडे वळालेला आहे.कारण शेतमालाला योग्य असा उत्पादन खर्चाच्या आधारावर हमी भाव नसल्यामुळे
शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे.आशा वेळी आपल्या कुटु़बाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरऱ्यांनी दुध व्यवसाय निवडलेला आहे.
आज दुध व्यवसायाची अवस्था सुध्दाबिकट झाली आसुन,ज्या प्रमाणात दुधाला दर असायला पाहिजे
तसा दर मिळत दुधाची दरवाढ करावी यासाठी राज्यात शेतकरी कामगार पक्षाने व ईतर ही काही पक्षांनी राज्यभर आंदोलने केली आहेत.
त्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली व दुधाचे दर काही प्रमाणात वाढण्यासाठी दुध संकलन केंद्राला आदेश दिले परंतु हि दर वाढ सुध्दा फसवी निघाली.
शेतकरी पशुपालकांना वाटले बरे झाले दुधाचे दर वाढवण्यात आले आहेत परंतु दुधाचे दर वाढवत असताना नवीन नियमावली लागु करण्यात आली
त्यामध्ये दुधाची प्रत कमी झाली तर दर कमी व ती प्रत कमी झाली म्हणुन आणखी दरामध्ये कपात ती ही एखाद्या जुलमी दंडासारखी . तरीही पशुपालक शेतकरी
काबाडकष्ट करुन दुध व्यवसाय टिकवुन आहेत आशा मनमानी कारभारा विरोधात जन आक्रोश तयार झाला व सरकारने लोकसभेच्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन दुधाच्या दरामध्ये वाढ
करण्यासाठी सरकारने प्रती लिटरला पाच रुपये प्रमाणे १जानेवारीपासुन अनुदान देण्याचे जाहीर केले.ते अनुदान थेट पशुपालकांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
या साठी अनेक दिवस माहिती गोळा करण्याचे काम प्रशासकीय पातळीवरती चालु होती ती माहिती संकलीत करण्यात आली..
अनुदान मिळवण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना आॕनलाईन प्रक्रियेतुन जावे लागले. आशा प्रकारे सरकारी अनुदानाचा लाभ काही ठरावीक पशुपालकांना झाला त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले.
परंतु आजही बहुतांश पशुपालकांना अनुदानापासुन दुर राहावे लागत आहे.कित्येकांना अजुनही आनुदान मिळालेले नाही.हेच अनुदान १० मार्च २०२४ पासुन बंद करण्यात आले आहे.
एकतर हे अनुदान सर्वांना मिळाले नसताना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व कार परवा २१/६/२०२४ ला अनुदाना बाबत नविन जि.आर निघालेला आहे.
पुंन्हा कागदी पत्रासाठी पशुपालक-शेतकऱ्यांना पळापळी करावी लागणार आहे.बहुतेक हा ही जि.आर.विधानसभा निवडणुका डोळ्या समोर ठेवुन काढलेला दिसतोय.
अनुदान जाहिर केले म्हणजे काय झाले आसे होत नाही तर ते सर्व पशुपालक -शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे कोणीही अनुदानापासुन वंचीत राहिले नाहि पाहिजे याची खबरदारु राज्य सरकारने घेतली पाहिजे.
पशुपालक आपले दुध ज्या दुध संघाला घालत आहेत त्या संघाशी अनुदानाबाबत विचारणा केली असता ते संघ राज्य सरकारकडे बोट दाखवुन रिकामे होत आहेत.
ते म्हणतात आंम्ही तुमच्या दुधाचे रितसर पैसे देतो आहे.राहिला विषय अनुदानाचा तो विषय राज्य सरकारचा आहे कारण अनुदान हे राज्य सरकार देणारा आहे.
आशा बिकट आवस्थेत पशुपालक शेतकरी सापडलेला आहे.केंद्र सरकार व राज्य सरकार मोठमोठ्या उद्योगपतींना हजारो कोटीची कर्जे माफ करीत आहेत
व करायची प्रक्रिया चालुच असते.अनेक मोठमोठ्या कंपन्यांना अनुदान देण्यासाठी सरकारचे व लोक प्रतिनीधींचे एकमत असते.
मग आमचा काबाड कष्ट करणारा पशुपालक शेतकरी अनुदाना पासुन दुर राहिला आसताना हे सगळे गप्प का बसतात अशी दुध व्यावसायीका मध्ये चर्चा होत आहे.
संविधानाने सर्वांना समान हक्क,समान न्याय दिला असताना आशा काबाड-कष्ट करणाऱ्या पशुपालकांना वेगळा न्याय का ?
त्यांना ठरल्या प्रमाणे अनुदान का मिळत नाही ? ते अनुदान मिळाले तर पशुपालक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल याचा
विचार सरकारने करणे गरजेचे आहे.शेती व्यवसायाची आवस्त्था जशी तोट्याची झाली आहे तशीच दुध व्यवसायाची सुध्दा अवस्था तोट्याचीच निर्माण झाली आहे.
या गोष्टिचा विचार गांभिर्याने राज्य सरकारने त्वरीत करुन ज्या पशुपालकांच्या दुधाचे अनुदान अजुनही जमा झाले नाही ते अनुदान ताबडतोब जमा करण्यात यावे
या साठी योग्य ती पावले राज्य सरकारने उचलावीत व पशुपालक शेतकऱ्यांना त्वरीत न्याय मिळवुन द्यावा अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दुध अनुदानासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल
असा इशारा पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ भाई बाबासाहेब देशमुख यांनी दिल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली
0 Comments