google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोला तालुक्यासाठी एकशे सत्तावन कोटी रक्कम मंजुर

Breaking News

मोठी बातमी..सांगोला तालुक्यासाठी एकशे सत्तावन कोटी रक्कम मंजुर

मोठी बातमी..सांगोला तालुक्यासाठी एकशे सत्तावन कोटी रक्कम मंजुर


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रं. एसीवाय-२०२३/प्र.क्र.५८/ म-७ दिनांक २९/०२/२०२४ अन्वये खरीप हंगाम २०२३ मधील

 दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता सांगोला तालुकेतील बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी

 एकूण १५७,०७,६७०००/- (एकशे सत्तावन कोटी सात लाख सदोसष्ट हजार फक्त) एवढी रक्कम मंजुर करणेत आलेली आहे.

खरीप हंगाम २०२३ मधील दुष्काळामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरीता वाधित शेतकऱ्यांना निविष्टा 

अनुदान प्रचलित कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHA IT यांचेकडून विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीव्दारे वितरीत करण्याची कार्यपध्दती शासन निर्णय दि. २४/०१/२०२३ अन्वये निश्चित करण्यात आली आहे 

व त्यानुसार विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी यांना नजिकच्या Common Service Centre (CSC- SPV) अथवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन त्यांनी आधार क्रमांकाव्दारे बायोमेट्रीक ओळख पटविणे

 आवश्यक आहे. दि. १८/०६/२०२४ रोजी पर्यंत सांगोला तालुकेतील एकूण ७३२७६ खातेदार रक्कम रुपये १,११,७२,१७,२२१/- (एकशे अकरा कोटी बात्तर

 लाख सतरा हजार दोनशे एकवीस रुपये फक्त) रुपयेच्या यादया रजिस्टर्ड पंचनामा या शासनाचे पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत.यापुर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण 

केलेल्या एकुण खातेदार ५४६९० रक्कम रुपये ८४५६९६७६७/ (चौ-वाऐंशी कोटी छपन्न लाख श्यान्नव हजार सालेश सदोसष्ट रुपये फक्त) एवढे अनुदान शासनातर्फे सबंधित शेतकरी यांचे खातेवर जमा करणेत आलेले आहे.

 दि. १७/०६/२०२४ रोजी एकूण ९८४२ खातेदार रक्कम रुपये १५१५४८४४५/- (पंधरा कोठी पंधरा लाख अठेचाळीस हजार चारशे

 पंचेचाळीस रुपये फक्त) सबंधित खातेदार यांचे बैंक खातेवर जमा करणेत आलेले आहेत.लवकरच अनुदान DBT व्दारे वितरीत करण्यात येणार आहे.

संगणकीय कार्यप्रणालीवर बँके कडून प्राप्त अहवालानुसार सांगोला तालुकेतील बरेचसे खातेदार यांची रक्कम खालील कारणास्तव त्यांचे बैंक खातेवर जमा होत नसलेचे निदर्शनास येत आहे.

(1) लाभार्थ्यांचा आधार क्रमांक बैंक खातेशी संलग्न नसणे, (ii) लाभार्थ्यांचा अधार क्रमांक निष्क्रीय (Inactive) असणे, 

तरी सर्व खातेदार यांनी आपले आधारकार्ड काढून किंवा Update करून ५ वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी


आज अखेर एकुण ६४५३२ खातेदार रक्कम रुपये ९९७२४५२१२/- (नव्यान्नव कोटी वात्तर लाख पंचेचाहीस हजार दोनशे बारा फक्त) एवढे अनुदान सबंधित खातेदार यांचे बैंक खातेवर जमा करणेत आलेले आहेत. तसेच आज अखेर सांगोला तालुकेतील एकुण ७८१४ एवढया खातेदारांची ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. ई-केवायसी पूर्ण केलेले शेतकरी यांचे खातेवर शासनाकडून

Post a Comment

0 Comments