google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक... कडबा कटरला स्पर्श होऊन सुस्तेत महिलेचा मृत्यू पंढरपूर तालुक्यातील घटना..

Breaking News

धक्कादायक... कडबा कटरला स्पर्श होऊन सुस्तेत महिलेचा मृत्यू पंढरपूर तालुक्यातील घटना..

धक्कादायक... कडबा कटरला स्पर्श होऊन सुस्तेत महिलेचा मृत्यू पंढरपूर तालुक्यातील घटना..


पंढरपूर तालुक्यात गोठ्यातील जनावरांना चारा टाकत असताना विद्युत कडबा कटरला स्पर्श होऊन एका महिलेचा मृत्यू झाला.

 विजेच्या धक्क्याने महिला मरण पावल्याची घटना पंढरपूर तालुक्यात सुस्ते येथे घडली.

विठाबाई सत्यवान चव्हाण (वय ५५, रा.सुस्ते, ता. पंढरपूर) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव असून बुधवारी १२ जून २०२४ रोजी सकाळ नऊच्या दरम्यान ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विठाबाई ह्या गोठ्यातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान कडबा कटर ह्या विद्युत उपकरणा स्पर्श होऊन त्यांना विजेचा करंट बसला. या घटनेत त्या जागीच मरण पावल्या.

दरम्यान कामानिमित्त घरातील माणसं ही पुण्याला गेली असल्याने तेथे कोणी नव्हते. दरम्यान रणजीत चव्हाण व सत्यवान पाखरे यांना ही घटना निदर्शनास आली.

 त्यांनी गावातील लोकांना याची माहिती दिली. कडबा कटरला पावसामुळे करंट आला होता.

 कडबा कटरला चिटकून विठाबाई सत्यवान चव्हाण यांचा मृत्यू झाल्याची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात बिटू चव्हाण यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments