खळबळजनक..प्रणिती शिंदे जिंकल्या, मनसे नेत्याला शरद पवारांच्या माणसाला द्यावे लागले 1 लाख
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार यावरून मनसेचा नेता आणि शरद पवार गटाच्या नेत्यामध्ये पैज लागली होती.
निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली. प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला.
मनसे नेत्याने या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला आव्हान दिलं होतं. आता निकालानंतर मनसे नेत्याने पैजेचा चेक शरद पवार गटाच्या नेत्याकडे सोपवला.
सोलापूर मध्ये शरद पवार गटाचे प्रदेश पदाधिकारी आणि मनसेचे लोकसभा अध्यक्ष यांच्यात निवडणुकीवरून 1 लाख 1 हजाराची पैज लागली होती.
भाजपचे राम सातपुते जिंकणार असा दावा करत मनसेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी 1 लाख 1 हजार रुपयांची पैज लावली.
तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे जिंकणार असा दावा करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी 1 लाख 1 हजाराच्या पैजेचा विडा उचलला होता.
मनसेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी शरद पवार गटाच्या प्रशांत बाबर यांना दिला 1 लाख रुपयांचा पैजेचा चेक दिला.
सोलापुरात काय झालं?
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचा 74197 हजारांनी विजय मिळवत भाजपला धक्का दिला.
आमदार प्रणिती शिंदे यांनी वडिलांच्या पराभवाचा वाचपा काढला. भाजपच्या दोन नवीन उमेदवारांनी 2014 आणि 2019 साली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता.
सोलापूर लोकसभा मतमोजणी 27 व्या फेरी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना सहा लाख 20 हजार 225 मते तर भाजप उमेदवार राम सातपुते यांना पाच लाख 46 हजार 28 मते मिळाली.
पहिल्या फेरीपासून प्रणिती शिंदे यांनी आघाडी घेतल्यानंतर पाचव्या फेरीपासून राम सातपुते होते आघाडीवर त्यानंतर दहाव्या फेरीनंतर प्रणिती शिंदे यांनी घेतलेली आघाडी मोठी झाली.
0 Comments