google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कोळा जुनोनी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस शेतीचे नुकसान, अनेकांच्या घरात पाणी गेले

Breaking News

सांगोला तालुक्यातील कोळा जुनोनी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस शेतीचे नुकसान, अनेकांच्या घरात पाणी गेले

सांगोला तालुक्यातील कोळा जुनोनी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस शेतीचे नुकसान, अनेकांच्या घरात पाणी गेले


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील कोळा, जुनोनी डोंगर पाचेगाव, किडबिसरी, कराडवाडी, कोंबडवाडी, तिप्पेहळी, गौडवाडी, गुणापवाडी, जुनोनी, काळूबाळूवाडी, जुजारपुर हटकर मंगेवाडी, 

नाझरे, चोपडी, हातीद, गौडवाडी, सोमेवाडी, बुधेहाळ या परिसरात बाजारपेठेत सगळीकडे पाणीच पाणी झाले असल्याचे दिसून आले गेले दोन-तीन दिवसापासून रात्रंदिवस

 मुसळधार पाऊस झोडपत आहे. विजांचा गडगडाट,तुफान वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे गेल्या कित्येक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेतील बळीराजा सुखावला आहे.

दोन-तीन महिन्यापासून कडक उन्हामुळे त्रस्त ग्रामस्थांना या पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे. दरम्यान, उन्हाळी शेती मशागतीची कामे पूर्ण करून बळीराजा पावसाची प्रतीक्षा करत होता. 

गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामासाठी हा पाऊस अतिशय पोषक असल्याचं शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे.

 या पार्श्वभूमीवर सध्या डाळिंब मका ज्वारी विविध पालेभाज्या फळभाज्यांच्या पिकासाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरू आहे. सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

 झाल्याचे निदर्शनास येत आहे. उभी पिके भुईसपाट झालेली आहेत. परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरुन वाहून शेतीचेही मोठे प्रमाणात नुकसान झाले.

 ओढ्याकडेच्या काही घरात पावसाचे पाणी शिरले. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या परिसरात शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत 

तर काही ठिकाणी खरीप पिकांच्या पेरणीची कामे चालू आहेत. अचानक पडलेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्या काही दिवसांसाठी लांबणीवर पडणार आहेत. 

शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे.

Post a Comment

0 Comments