ब्रेकिंग न्यूज...सरकारी कामांमध्ये अडथळा आणणे या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी अनिल साठे८९२८२८४३००
संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
ठाणे लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी बल प्रयोग करणे या आरोपातून
आरोपी अशोक बाबासाहेब पाटील यांची ठाणे येथील आठवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे यांनी सत्र खटला क्रमांक 238/ 2019 मध्ये पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली
याबाबत सविस्तर वृत्त असे की गोविंद दगडू साळुंखे यांनी दिनांक 21/ 11 /2016 रोजी वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की, दिनांक 21/ 11/ 2016 रोजी सकाळी 11.15 वाजता स्टेट ट्रान्सपोर्ट
को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या या बँकेच्या वतीने शासकीय कामाकाजाकरिता कामगार उपायुक्त मुलुंड चेक नाका ठाणे येथे फिर्यादी गोविंद दगडू साळुंखे गेले
असता आरोपी अशोक बाबासाहेब पाटील हे त्यांच्या बँकेतील बडतर्फ कर्मचारी असून त्यांनी केलेल्या तक्रारी संबंधित बँकेच्या वतीने हजर
राहिल्याचा राग मनात धरून त्यांनी शासकीय कामकाज करू नये या हेतूने त्यांना मारहाण व शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यांच्या फिर्यादीवरून अशोक बाबासाहेब पाटील यांच्याविरुद्ध
वागळे वागळे इस्टेट पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक I 323/ 2016 भा. दं. वि. कलम 353,352,504, 506 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर प्रकरणात वागळे इस्टेट पोलीस स्टेशन ठाणे यांनी तपास करून आरोपी विरुद्ध आरोपपत्र मे. न्यायालयात न्यायालयात दाखल केले
आरोपी अशोक पाटील यांच्याविरुद्ध चाललेल्या सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले.
परंतु आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही सदर प्रकरणात ऍड. बाबासाहेब सर्जेराव बनसोडे यांनी आरोपीच्या वतीने घेतलेला बचाव व केलेल्या
युक्तीवादात ग्राह्य धरून ठाणे येथील आठवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी अशोक बाबासाहेब पाटील यांची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली.
सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने एडवोकेट बाबासाहेब सर्जेराव बनसोडे यांनी काम पाहिले व त्यांना एडवोकेट अंकुश गोविंदराव गवळे यांनी सहकार्य केले.
0 Comments