google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...पैलवानाने गळफास लावून संपवलं आयुष्य, 'कुमार केसरी'च्या मृत्यूने सांगलीत खळबळ

Breaking News

खळबळजनक घटना...पैलवानाने गळफास लावून संपवलं आयुष्य, 'कुमार केसरी'च्या मृत्यूने सांगलीत खळबळ

खळबळजनक घटना...पैलवानाने गळफास लावून संपवलं आयुष्य, 'कुमार केसरी'च्या मृत्यूने सांगलीत खळबळ


सांगली : सांगलीमध्ये पैलवानाने जीवन संपवल्यामुळे खळबळ माजली आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीयेथील नामवंत पैलवान सुरज निकम याने राहत्या घरी गळफास लावून घेतला आहे.

दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सुरज निकमने टोकाचं पाऊल उचललं. सुरज निकमच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सुरज निकम हा नामवंत मल्ल आहे. त्याने यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटाकवले आहेत. विरोधी पैलवानाला कोणत्या

 डावावर चितपट करायचे यात त्याचा हातखंडा होता. सुरजने अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवला होता.

 कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लाना त्याने आस्मान दाखवले आहे, परंतू आज त्याने राहत्या घरी गळफास घेवून आपले जीवन संपवले.

सुरज वडिलांचे निधन झाल्यानंतर व्यथित झाला होता. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेतल्याचं समोर आलं. निधनाचे वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सांगलीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

निधनानंतर सुरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. उद्या दुपारी सुरजचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 पै. सुरज निकमने जीवन का संपवलं? याबाबत पोलिस तपास करत असून सुरजने टोकाचा निर्णय का घेतला? याचं कारण अजूनही समोर येऊ शकलं नाही.

Post a Comment

0 Comments