google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला विष पाजून आईने स्वतः गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

Breaking News

खळबळजनक..अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला विष पाजून आईने स्वतः गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

खळबळजनक..अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाला विष पाजून आईने स्वतः गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा


वरोरा तालुक्यातील शेगाव ( बु) पोलीस स्टेशन  येथील धक्कादायक घटना 

वरोरा : तालुक्यातील शेगाव (बु) येथे काल दिनांक २८ रोज शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास येथील रहिवासी असलेल्या आईने  आपल्या 

अवघ्या ९ महिन्यांच्या बाळाला  विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्या महिलेने गळफास लावून घेत स्वत:चं आयुष्यही संपवलं.

वरोरा तालुक्यातील शेगाव या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पल्लवी मितेश पारोधे वय (२७) असं मृत महिलेचं नाव असून

 तिने राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या तर तिच्या अवघ्या या ९ महिन्यांच्या मुलाला तिने आत्महत्येपूर्वी विष दिल्याचे निष्पन्न झाले. 

त्या मुलाला चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

मात्र त्याच्या डोक्यावरून आईचे छत्र मात्र कायमचे हरपले असून त्यामुळे शेगाव परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,वरोरा तालुक्यातील शेगाव येथील नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपूर्वी  पल्लवी हिच्यासोबत लग्न झाले. त्यांना ९ महिन्याचा मुलगा आहे.

 आज पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध अवस्थेत आढळला तर त्याची आई, पल्लवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. 

 या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 पल्लवी हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करून मृत पल्लवीचा मृतदेव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठवला.

 मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून सासरची लोकं पैशांसाठी वारंवार त्रास देत असल्याचा  आरोप करत तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 त्यानुसार शेगाव पोलिसांनी हुंडाबळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत मयत पल्लवी हिचा पती व दिर यांस अटक केली आहे. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments