ईद साठी घेतलेला बोकड (रव्या )दिला रिटन.
सांगोला प्रतिनिधी/ शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज समाधान मोरे.
धायटी गावचे सिताराम मोरे यांचा बोकड (रव्या) विक्री साठी गुरुवार दिं.13.6.2024रोजी लोनंद या ठिकाणी आणला होता
त्यची रितसर31000योग्य किंमत आल्यावर कोणताही पत्ता नाव नंबर गाव न विचारता दिला.
पंरतु सिताराम मोरे यांणा रिंटन घरी गेल्या नंतर रव्या विना चैन पडेना त्यांना कोनत्या ही परस्तिती त्यांचा बोकड (रव्या)रिटन हवा होता सिताराम मोरे यांचे दुख पाहुन
सिताराम मोरे यांचे मित्र आरुण भंडारे (आण्णा) विश्वास जाधव. समाधान माडेकर.व सिताराम मोरे यांचा लहान भाऊ समाधान मोरे.यांनी त्यांच बोकड (रव्या)रिटन आणण्याचा निर्णय घेतला
परंतु कुठलाही पत्ता नाव नंबर माहित नसल्याने सिताराम मोरे यांच बोकड (रव्या) रिटन कसा शोध लावायचा हा प्रश्न गंभीर होता.पण पिकप वरिल जय महाराष्ट्र नाव माहित होते
मग लोनंद या ठिकाणी पोहचले आसता लोनंद पोलिस स्टेशनचे हवालदार राहुल मोरे.व कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद.येथिल लिपिक.सौ.प्रतिभा दत्तात्रय धापते मॅडम यानि.
खुप मोलाचे काम करुन समिर अत्तार कुडाळ ता.खंडाळा जि.सातारा यांचा पत्ता शोधुन काडला.कुडाळा या ठिकाणी पोहचल्यावर समिर अत्तार यांनी विना मोबदला न घेता
नि स्वार्थ पणे सिताराम मोरे यांचा बोकड (रव्या)रिटन केला त्यानंतर सिताराम मोरे यांनी त्यांच्या बोकड (रव्या)शोधन्यास मोलाचे सहकार्य केले त्या बद्दल लोणंद पोलीस स्टेशनचे हवालदार
राहुल मोरे व लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिपिक.सौ.प्रतिभा दत्तात्रय धापते मॅडम.यांचा छोटासा सत्कार करुन त्यांचे अंतकरण पूर्वक आभार मानले.
0 Comments