धक्कादायक प्रकार ! पत्नीने रात्रीचे जेवण देण्यास नकार दिल्याने पत्नीचा गळा चिरून खून यानंतर पत्नीची कातडी सोलून रात्रभर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले
कर्नाटकातील तुमकूर येथे एका व्यक्तीने पत्नीचा गळा चिरून खून केला. यानंतर पत्नीची कातडी सोलून रात्रभर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.
आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीने रात्रीचे जेवण देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले आहे.
घरातील स्वयंपाकघरात आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे लपवले होते. आरोपी पती हा पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलासह राहत होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा (वय३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवराम असे आरोपी पतीचे नाव आहे. शिवराम हा एका मिलमध्ये कामाला होता.
सोमवारी सायंकाळी कामावरून घरी आल्यावर त्याने पुष्पाला जेवण मागितले. मात्र, जेवण बनवले नाही असे सांगत तिने जेवण देण्यास नकार दिला.
याचा राग आल्याने दोघांत जोरदार भांडण झाले. याच रागाच्या भरात शिवरामने संतापून पुष्पाची चाकूने भोसकून हत्या केली. एवढेच नाही तर त्याने पत्नीची कातडी सोलून रात्रभर मृतदेहाचे तुकडे केले.


0 Comments