google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पुणे हादरलं! जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जिवंत गाडलं;

Breaking News

पुणे हादरलं! जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जिवंत गाडलं;

पुणे हादरलं! जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जिवंत गाडलं; 


पोलिसांसमोर खड्यात गाडल्याचा आरोप, एपीआय व पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची पिडीतेची मागणी

पुणे जिल्ह्यात एका तरुणीला जमिनीत जिवंत गाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द  गावात घडला आहे. 

25 ते 30 जणांनी जेसीबीच्या सहाय्याने जमिनीत खड्डा खणून तरुणावर माती टाकली.

 तरुणीला जिवंत गाडल्याचा पुण्यातील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार पोलिसांसमोर घडल्याचा आरोप पिडीत मुलीने केला आहे.

 दरम्यान, पिडीत मुलीने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करुन संबंधीत पोलिसांवर व गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

22 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीत वेल्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ  पोलीस कर्मचारी औदुंबर आढवाल, संभाजी नथू खोपडे, 

ज्ञानोबा ओव्हाळ, निखील गायकवाड, बाळू भोरोकर, उमेश धायगावे, संग्राम गुजर, स्वप्निल भुरुक, ज्ञानेश्वर भुरूक, मुंबईचे पाच गुंड, तीन ट्रॅक्टर चालक,

 जेसीबी चालक व इतर अनोळखी पाच जणांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

तरुणीची वडीलोपार्जित जमीन असून पुनर्वसानात जमीन मिळवणारे ज्ञानोबा ओव्हाळ यांनी शेतकरी असल्याचे भासवून प्रांत अधिकाऱ्यांची फसवणूक केली. त्यानंतर पुणे न्यायालयात याबाबत दावा दाखल

 करण्यात आला असून हा दावा न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना वेल्हे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी गुंडांना सहकार्य करत

 जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी आले होते. मात्र, गुंडांनी हत्या करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस अधिकारी व कर्मचारी तेथून पळून 

गेल्याचे पिडीत तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. तसेच पोलिसांनी मोबाईल जप्त करुन त्यातील पुरावा नष्ट करणार असल्याचा आरोप मुलीने केला आहे.

22 वर्षाच्या तरुणीला जमिनीच्या वादातून जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जमिनीत गाडलेल्या या तरुणीने स्वत:च पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ज्यात तरुणी कंबरेपर्यंत मातीत गाडलेली असल्याचे दिसत आहे.

तरुणीने राजगड पोलीस ठाण्यात रितसर लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयपीसी 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे,

बाळू भोरकर, उमेश जयस्वाल अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ, धमकी देणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात आणखी 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments