google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विकृती! आता तुला सोडत नाही, म्हणत भांडणाचा राग मनात धरून डोक्यात टॉमी मारून शिक्षकाचे डोके फोडले सांगोला तालुक्यातील घटना...

Breaking News

विकृती! आता तुला सोडत नाही, म्हणत भांडणाचा राग मनात धरून डोक्यात टॉमी मारून शिक्षकाचे डोके फोडले सांगोला तालुक्यातील घटना...

विकृती! आता तुला सोडत नाही, म्हणत भांडणाचा राग मनात धरून डोक्यात टॉमी मारून शिक्षकाचे डोके फोडले सांगोला तालुक्यातील घटना...


सांगोला:- मागील भांडणाचा रोष मनात धरून एकाने कारमधून दुचाकीचा पाठलाग करून जिवंत सोडणार नाही, म्हणत लोखंडी टॉमी डोक्यात मारून प्राथमिक शिक्षकाचे डोके फोडले.

ही घटना रविवारी सायंकाळी ४:३०च्या सुमारास सांगोला-जत रोडवर माण नदी पुलानजीक घडली.याबाबत ज्ञानेश्वर सुखदेव टोणे (रा. शिवाजीनगर, कडलास रोड, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी हिंमत पांडुरंग गळवे (रा.वाळेखिंडी, ता. जत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी ज्ञानेश्वर टोणे हे प्राथमिक शिक्षक असून, आरोपीसोबत यापूर्वी किरकोळ वाद झाल्याने त्यांनी जत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तो फिर्यादीवर चिडून होता.

दरम्यान, १२ मेरोजी सायंकाळी ४:३० च्या सुमारास टोणे हे मूळ गाव वाळेखिंडी येथून दुचाकीवरून जतकडून सांगोला येथील घराकडे येत होते.

माण नदी पुलावर आले असता पाठीमागून कारमधून आरोपी हा त्यांच्या दुचाकीच्या मागे जोरजोराने रेस करत होता. 

फिर्यादीने त्यास माझ्या गाडीच्या पाठीमागे येऊन कार रेस का करतो? असे विचारले असता आरोपीने फिर्यादीस तू मागील भांडणात वाचला आहे,

आता तुला सोडत नाही, म्हणत शिवीगाळ केली. कारमधून लोखंडी टॉमी त्यांच्या डोक्यात मारली. रक्त येत असल्याचे पाहून तेथून जाणाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments