google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ..भजीला का हात लावलास म्हणून एकाला झाऱ्याने मारहाण आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

Breaking News

खळबळजनक ..भजीला का हात लावलास म्हणून एकाला झाऱ्याने मारहाण आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल

खळबळजनक ..भजीला का हात लावलास म्हणून एकाला झाऱ्याने मारहाण आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल


आटपाडी : भजीला का हात लावलास म्हणून, मासाळवाडी ता. आटपाडी येथील एकाला वडापाव गाडी चालकाने 

झाऱ्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना आटपाडी येथे घडली. याबाबत आरोपी विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहित अशी, यातील फिर्यादी अंकुश आप्पा मासाळ वय 42 वर्षे रा.मासाळवाडी हे आटपाडी शहरातील बाजार पटांगण येथील धनश्री वडापाव सेंटर येथे

 नाश्ता करण्यासाठी गेले व 10 रूपयाची भजी मागितली. ते भजी गरम आहेत काय हे पाहण्यासाठी 1 भजा उचलल्यावर यातील

 आरोपीत याने फिर्यादीस असता तू भजीला का हात लावलास म्हणून फिर्यादीस शिवी देत कडईतून भजी बाहेर काढण्यासाठीचा झाऱ्या फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले आहे.

तसेच दूसऱ्या वेळेस झाऱ्या मारणार त्यावेळेस फिर्यादीने त्यांना पकडले व झाऱ्या हिसकावून खाली टाकला. 

त्यावेळी आरोपीने त्याच्या कमरेला असलेला कांदा कापण्यासाठीचा असणारा चाकू काढून फिर्यादीचे पोटात मारणार

 इतक्यात फिर्यादीचे गावचे नारायण मेटकरी हे मध्ये आले व त्यांनी तो चाकू पकडला. यामध्ये नारायण मेटकरी यांचे हातासही जखम झाली आहे.

याबाबत फिर्यादी यांनी आटपाडी पोलिसात सदर घटनेने बाबत दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments