कोळा टेंभू योजनेचे पाणी गाव ओढ्याला सोडावे : विलासराव देशमुख
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील कोळा येथे लक्ष्मी देवीची यात्रा सुरू होणार बाहेरगाव असणारी पाहुणे मित्रमंडळी गावकर यांची मोठी गर्दी होणार
असून शेतीला शेतकऱ्यांची पाण्याची अडचण आहे पाणी नसल्यामुळे ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठ्यालाही पाणीच नसल्यामुळे यात्रेच्या तोंडावर अडचण झाली आहे
यामुळे टेंभू योजनेचे पाणी कोळा गाव ओढ्याला सोडावे सर्वसामान्य शेतकरी गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जेष्ठ नेते विलासराव देशमुख यांनी केली आहे.
कोळा भागात अत्यल्प पाऊस आणि वाढलेल्या कडक उष्णतेमुळे पाणी पातळीत झपाट्याने घट झाली आहे. ओढ्या काठच्या विहिरी आटून गेल्या आहेत
कोळा ते गौडवाडी हद्दीपर्यंत सर्वच बंधारे कोरडे पडले आहेत या पाण्यावर शेतकरी वर्ग अवलंबून असलेल्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे.
समाधानकारक पाऊस न झाल्याने यावर्षी पाणीपातळीत लक्षणीय घट झाली. परिणामी, विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी अधिकच खालावली आहे.
टेंभू योजनेच्या पाणी सोडले तर उन्हाळी आवर्तनामुळे पिकांना संजीवनी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे; परंतु अद्याप टेंभूचे पाणी पूर्ण क्षमतेने चालू नाही
सध्या कोळा कॅनॉल चालू आहे इतर गावांना सुरू आहे परंतु कोळा गावठाणात लक्ष्मी देवी यात्रा असल्यामुळे पाणी सोडले तर यात्रेकरूंना व शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल
पाणी नसल्यामुळे डाळिंब, केळी, ऊस, मका, पालेभाज्या पीक धोक्यात आहेत. शासनाने तातडीने लक्ष देऊन टेंभू योजनेचे पाणी गाव ओढ्याला सोडावे असे देशमुख यांनी सांगितले.
0 Comments