खळबळजनक... सोलापूर रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी
सोलापूर : दिनांक १३ मे रोजी रियाज कसाब या इसमाने सांगली पोलीस शहर ठाण्यात फोन करून बॉम्ब स्फोटाने रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापुर पूणे ही रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी दीली आहे.
या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली असून अशा पाश्र्वभूमीवर आरपीएफ जवान व रेल्वे पोलीस यांच्या पथकाने सर्व रेल्वे स्थानकांची तपासणी केली.
स्फोटक सदृश्य संशयीत वस्तूला हात लावू नये. संशयीत व्यक्तीचा शोध सुरु असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये
म्हणून नागरीक व रेल्वे प्रवाशांनी दक्षता बाळगावी असे आवाहन कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडिजल मांनी एका निवेदनातून केले आहे.
0 Comments