ब्रेकिंग न्यूज..कर्जाचे पैसे देतो म्हणून बोलावले, पतसंस्थेच्या वसुली पथकातील अधिकाऱ्यास कारमध्ये
बसवून केले अपहरण, घरामध्ये कोंडून केली मारहाण सांगोला तालुक्यातील घटना...
कर्जाचे पैसे देतो म्हणून बोलावून घेऊन ७ जणांनी मिळून फॅबटेक पतसंस्थेच्या वसुली पथकातील फिल्ड ऑफिसरला
जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरण केले व एका घरामध्ये कोंडून मारहाण करून गंभीर जखमी केले.
तसेच पॅन्टच्या खिशातील १४ हजार ४०० रुपयांसह मोबाइल जबरदस्तीने काढून घेतला. ही घटना १२ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास जवळा (ता. सांगोला) येथील गावडे चौकात घडली.
याबाबत ऋतिक दादासाहेब पवार (रा. घेरडी ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकास गावडे, अनिल गावडे, प्रकाश गावडे, विलास गावडे, सुभाष गावडे, प्रदीप गावडे व वैभव राऊत (सर्वजण रा.जवळा,ता.सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फिर्यादी, ऋतिक पवार हे फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सांगोला शाखा घेरडी येथे फिल्ड ऑफिसर म्हणून नोकरी करत आहे.
ऋत्विक यांच्या मोबाइलवर फोन करून कर्जाच्या पैशाची जुळवाजुळव झाली असून तुम्ही गावडे चौक जवळा येथे ताबडतोब येऊन पैसे घेऊन जावा, नाहीतर पैसे खर्च केले तर पुन्हा काही सांगू नका असे सांगण्यात आले.
ऋतिक यांना जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून डिकसळ रोडवरील एका घरात नेऊन घराचा दरवाजा बंद केला. त्यावेळी त्याने मला येथे का? आणले आहे, असे विचारले असता कमलेश आता वर गेला आहे,
तुला पण कर्जाचे पैसे आणण्यासाठी वर जावे लागणार असे बोलून आरोपीने त्यांच्या खिशातील १४,४०० रुपये व मोबाइल फोन काढून घेतला व काठ्या, पट्टा, पाईप, केबलने जबर मारहाण केली.
त्यावेळी त्यांनी आता याला येथे ठेवायला नको दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ असे म्हणून सर्वांनी त्याला उचलून घेऊन रस्त्यावर कारकडे आणले नेमके त्यावेळी पोलिस आल्याचे पाहून त्यांनी मला तिथेच सोडून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments