कै. महादेव (बाळासाहेब) मिसाळ यांच्या स्मरणार्थ अहिल्यानगर येथे पाणपोई सुरू
सांगोला / (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे)
कै. महादेव (बाळासाहेब) मिसाळ यांच्या स्मरणार्थ अहिल्यानगर येथे राजमाता उद्योग समूह सांगोला निशांत मिसाळ यांच्या सौजन्याने पाणपोई सुरू करण्यात आली. सध्या उन्हाची तीव्रता वाढली
असून आता शरिराला नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासू लागली आहे. कामानिमित्त रणरणत्या उन्हात बाहेर पडलेल्या तहानलेल्या जीवांना पाणपोईचा गारवा मिळतो आहे.
एप्रिल मे महिन्यातील होणारे तीव्रता लक्षात घेऊन वाढते तापमान याचा विचार करून सांगोला शहरात येणाऱ्या नागरिकांचे पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये
या उद्देशाने सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राजमाता उद्योग समूहाने हा पाणीपोई चा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले
जात असून, शहरात ठिकठिकाणी पाणीपोई सुरू व्हाव्यात. तहानलेल्या नागरिकांना पाणी मिळावे हीच यातून अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवूण व फीत कापून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष कशिलिंग (बाबू) गावडे,
ओन्ली रिक्स ग्रुप महाराष्ट्र चे अध्यक्ष बंडू (नाना) मासाळ, राजमाता पीपल्स चे चेअरमन तायाप्पा माने, विशाल माने, धनगर समाज सेवा मंडळाचे संचालक माऊली गाडेकर, निशांत मिसाळ, म्हाळाप्पा शिंगाडे,
शहाजी गाडवे, माजी अध्यक्ष आकाश व्हटे, विजय मासाळ, राजू कोकरे, देविदास गावडे, योगेश लवटे, संतोष लवटे, विशाल मोटे, राहुल मंडले, औदुंबर इरकर आदी उपस्थित होते.
चौकट
सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना राजमाता उद्योग समूहाने एक पाऊल पुढे येत जो पाणपोई सुरू करण्याचा उपक्रम केला आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. त्याचबरोबर कै.महादेव मिसाळ यांच्या स्मरणार्थ शहरांमध्ये आलेले लोकांचे तहान भागवण्याच काम या ठिकाणी केले आहे. हा एक चांगला उपक्रम राबवल्यामुळे शहरवासीयांच्या स्मरणात (आठवणीत)खऱ्या अर्थाने कै. महादेव (बाळासाहेब) मिसाळ राहतील.
मा. काशिलिंग गावडे अध्यक्ष, मायाक्का प्रतिष्ठान सांगोला
0 Comments