google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावधान पालकांनो.. आपली मुले सांभाळा! क्रिकेट खेळायला गेलेल्या ११ वर्षाच्या मुलाचे अपहरण,मामाची पोलिस ठाण्यात धाव,सोलापूरमधील घटना

Breaking News

सावधान पालकांनो.. आपली मुले सांभाळा! क्रिकेट खेळायला गेलेल्या ११ वर्षाच्या मुलाचे अपहरण,मामाची पोलिस ठाण्यात धाव,सोलापूरमधील घटना

 सावधान पालकांनो.. आपली मुले सांभाळा! क्रिकेट खेळायला गेलेल्या ११ वर्षाच्या मुलाचे अपहरण,


मामाची पोलिस ठाण्यात धाव,सोलापूरमधील घटना 

सोलापूर क्रिकेट खेळायला बाहेर गेलेल्या ११ वर्षाच्या मुलास फूस लावून त्याचे अपहरण केल्याचा प्रकार शहरातील आशानगर परिसरात उघडकीस आला. 

श्रेयस प्रकाश पावले (वय- ११) असे अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे. 

या प्रकरणी मुलाचे मामा सुभाष राजशेखर चिट्टे (वय- ३६, आशानगर, बसवेश्वर चौक, सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचा भाच्चा श्रेयस हा शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानावर क्रिकेट खेळायला म्हणून गेला. 

ते मित्रांसोबत खेळत असताना काही वेळानं त्यानं मित्रांना माझे मामा आले आहेत मी दुसरीकडे क्रिकेट खेळायला जातो म्हणून निघून गेला.

रात्री उशीर झालातरी श्रेयस परत न आल्याने साचे नातलग चिंतेत पडले. सर्व नातलगांकडे चौकशी केली. रात्र उलटून गेली तरी सकाळीही तो परत आला नाही.

 यामुळे फिर्यादीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या भाच्च्याला फूस लावून कोणीतरी त्याचे अपहरण केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी तपास फौजदार व्ही. एस. बनसुडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments