google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...मामाच्या गावाला.; प्राजक्ताने भाळवणी गावातील सांगितली अनोखी परंपरा

Breaking News

मोठी बातमी...मामाच्या गावाला.; प्राजक्ताने भाळवणी गावातील सांगितली अनोखी परंपरा

मोठी बातमी...मामाच्या गावाला.; प्राजक्ताने भाळवणी गावातील सांगितली अनोखी परंपरा


अभिनेत्री प्राजक्ता माळीने मालिका, चित्रपटांसह वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सोशल मीडियावर देखील ती नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या व्यस्त शेड्युलमधून देखील ती कुटूंबासाठी वेळ देते. 

नुकतेच प्राजक्ता पंढरपूर जिल्ह्यातील भाळवणी येथे तिच्या मामाच्या गावाला गेली होती. येथील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तिने भाळवणी गावातील अनोखी परंपरा सांगितली आहे.

या व्हिडीओत प्राजक्ताच्या लहान भाचीही खेळताना दिसत आहेत. प्राजक्ता सुद्धा गावातील वयोवृद्ध माणसांसोबत गप्पागोष्टी करताना दिसते. 

हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने गावातील अनोखी परंपरा सांगितली. हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्ताने लिहिले

 की, “मामाच्या गावाला जाऊया…२ मित्र मैत्रीत एकमेकांना वचन देतात, आपण नाही राहिलो तरी जोवर चंद्र-सुर्य आहेत तोवर आपली मैत्रीची आठवण राहील. 

ही कावड चालू राहील. तुझ्या समाजातील भांडण सोडवायला माझा समाज धावेल, माझ्या समाजातील अडचणी तुझा समाज सोडवेल."

प्राजक्ता पुढे लिहिते, ” इथून पुढे एकमेकांच्या पाठीशी दोन्ही बाजू खंबीरपणे उभ्या राहतील आणि त्यांनी दिलेलं वचन हे गावकरी गेली

 ५-६ पिढ्या निगुतीनं पाळतायेत; ही कावड आजही चालू आहे आणि दोन समाजांमधील प्रेम अबाधित आहे.

 सगळी कामं बाजूला ठेवून सगळे कावडीला खांदा द्यायला सगळे धावून येतात.” प्राजक्ताचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या गावातील परंपरेचं कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments