google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक...हातउसने दिलेली रक्कम परत न केल्याने तरुणाचा दगडाने ठेचून खून सोलापूर जिल्ह्यातील घटना..

Breaking News

धक्कादायक...हातउसने दिलेली रक्कम परत न केल्याने तरुणाचा दगडाने ठेचून खून सोलापूर जिल्ह्यातील घटना..

धक्कादायक...हातउसने दिलेली रक्कम परत न केल्याने तरुणाचा दगडाने ठेचून खून सोलापूर जिल्ह्यातील घटना..


सोलापूर : हातउसने घेतलेली ५० हजार रुपये परत न दिल्याचा रोष मनात धरून एका मागासवर्गीय तरुणाचा दगडाने ठेचून खून

 करून नंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काटी ते बीबी दारफळ रस्त्यावर घडला.

या घटनेची फिर्याद आठवड्यानंतर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहेमहेश ऊर्फ बबलू भारत लोंढे

 (वय ३०, रा. गावडी दारफळ, ता. उत्तर सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ आनंद भारत लोंढे याने दिलेल्या फिर्यादीनुसार अजय सौदागर कदम 

(वय २३, रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. त्याने मृत महेश लोंढे यास काही महिन्यांपूर्वी हातउसने म्हणून ५० हजार रुपये दिले होते. 

ही रक्कम मुदत संपल्यानंतरही परत करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे अजय कदम हा महेश लोंढे याच्यावर चिडून होता. तो भेटतही नव्हता. दरम्यान, अकोले काटी ते बीबी दारफळ

 रस्त्यावर संभाजी दशरथ भोसले यांच्या शेताजवळ महेश लोंढे यास अजय कदम याने गाठले आणि रागाच्या भरात त्याने दगडाने ठेचून त्याचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. 

याप्रकरणी त्याच्यावर खुनासह गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे आणि जातीवाचक शिवीगाळ करणे (ॲट्रासिटी कायदा) आदी कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments