google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निघृण हत्या! 'आईने धरले पाय, भावाने चिरला गळा', .....

Breaking News

निघृण हत्या! 'आईने धरले पाय, भावाने चिरला गळा', .....

निघृण हत्या! 'आईने धरले पाय, भावाने चिरला गळा', .....


आंतरजातीय प्रेमविवाहातून हत्या करण्यात आल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे.

 या घटनेत आई आणि भावाने मिळून किचनमध्ये कोयत्याने बहिणीची निघृण हत्या केल्याची घटना घडली आहे.इतकंच नाही तर भावाने शीर धडावेगळं करून त्यासोबत सेल्फी देखील काढला होता. 

ही घटना 5 डिसेंबर 2021 रोजी घडली होती. या प्रकरणात आता आरोपी आई आणि भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 नेमकं हे संपूर्ण हत्याकांड काय आहे? हे जाणून घेऊयात.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली होती. 

गोयगाव येथील रहिवासी असलेल्या किशोरी उर्फ किर्ती (19) हिचे अविनाश संजय थोरे (22) यांच्याशी जून 2021 मध्ये प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता.

यातूनच किर्तीची आई आणि तिच्या लहान भावाने तिच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार अविनाश आणि किशोरी राहत असलेल्या लाडगाव शिवारात इट क्रमांक 307 मध्ये आई आणि तिचा भाऊ गेला होता.

 यावेळी आई आणि भावाने मिळून किचनमध्ये किर्तीची हत्या केली. आईने किर्तीचे पाय धरले तर भावाने कोयत्याने तिच्या मानेवर सपासप वार केले. 

जिथपर्यंत शीर धडापासून वेगळं होत नाही, तिथपर्यंत भाऊ बहिणीच्या मानेवर वार करतच राहिला. आणि शीर धडापासून वेगळ केल्यानंतर त्याने शीर हातात घेऊन त्यासोबत सेल्फी काढला होता.

 या प्रकरणी अविनाश संजय थोरे यांच्या तक्रारीवरून आई शोभा मोटे आणि भाऊ संकेत मोटे यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सूरू करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

 यानंतर आता तीन वर्षानंतर वैजापूर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आई आणि भावावा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल दिला आहे.

Post a Comment

0 Comments