google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कोळा ते किडबिसरी खराब रोडमुळे रस्त्याची लागली वाट..? रस्ता लवकर दुरुस्त करावा अन्यथा खड्यात वृक्षारोपण करणार ग्रामस्थांचा इशारा

Breaking News

सांगोला तालुक्यातील कोळा ते किडबिसरी खराब रोडमुळे रस्त्याची लागली वाट..? रस्ता लवकर दुरुस्त करावा अन्यथा खड्यात वृक्षारोपण करणार ग्रामस्थांचा इशारा

सांगोला तालुक्यातील कोळा ते किडबिसरी खराब रोडमुळे रस्त्याची लागली वाट..? रस्ता लवकर दुरुस्त करावा अन्यथा खड्यात वृक्षारोपण करणार ग्रामस्थांचा इशारा


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

कोळा (वार्ताहर):-सांगोला तालुक्यातील सोलापुर जिल्हयाचे शेवटचे मोठे गाव म्हणुन कोळा गावाची ओळख आहे. कोळा- कोंबडवाडी-किडबिसरी या नऊ कि.मी. रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे.

 गेल्या अनेक वर्षांपासून किडबिसरी रोडची दयनीय अवस्था झाली असुन रस्त्याच्या दोन्ही बाजुला बाभळीच्या, 

चिलारच्या झाडाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. 

रस्त्याचे चांगले डांबरीकरण करावे, रोडवरील घाण, बाभळीचे झुडपे काढावीत तसेच अरुंद रस्ता मोठा करावा अशी सर्वसामान्य जनतेने मागणी केली आहे.

कोळा गावाची लोकसंख्या साधारणपणे नऊ हजाराच्या आसपास आहे, गावात कपड्याचे, किराणा मालाचे दुकाने व मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्यामुळे

 आठवडा बाजारही शुक्रवारी भरत असतो यामुळे किडबिसरीच्या नागरीकांचा कोळे गावाकडे ओढा जास्त असतो, या मार्गावर दिवसभर ट्रक, टेम्पो, वडापचे टमटम, 

मोटारसायकली, काँलेजचे सायकल वरुन जाणारे विद्यार्थी यांची दिवसभर ये जा सुरु असते. फक्त एकमेव एसटी सांगोला कोंबडवाडी खराब रस्त्यामुळे बस ही बंद झाली

आहे. कोळा येथील नागरिकांसाठी नागपूर रत्नागिरी व विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी नागज फाटा मार्गे

 महत्वाचा जवळचा मार्ग असून याकडे सातत्याने संबधीत विभागाकडुन दुर्लक्ष केले जात आहे. या रोडवरील खंडागळे वस्ती, करांडे वस्ती, 

कोळेकर वस्ती, शिवेचीवाडी मळा, सरगरवाडी कोंबडवाडी घागरे वस्ती या ठिकाणी डाबरीकरण खराब - खडी पुर्णपणे उचकटलेली आहे. वाहनधारकांना कसरत करुन वाहन चालवावे लागत आहे ,

 घागरे वस्ती जवळ रोड अरुंद असल्यामुळे पुढील वाहने काटेरी झुडपामुळे दिसत नाहीत. विहिरीला कठडा नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा व रोडवरील काटेरी झुडपे काढावीत, चांगले डांबरीकरण करावे अशी नागरिकांची व युवक वर्गाची अपेक्षा आहे.

सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सांगोला विभागाने कोळा ते किडबिसरी रस्ताचे चांगले डांबरीकरण करावे सर्वसामान्य जनतेतून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments