निरा उजवा कालव्याचे पाणी लवकरात लवकर सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा असे मत डॉ. भाई बाबासाहेब देशमुख
(सांगोला प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
निरा उजवा कालव्याचे पाणी वेळेआधीच बंद केल्याने व जे पाणी दिले ते ही पुर्ण क्षमतेने दिले नसल्याने शेतकऱ्यांची पिके जळुन गेली आहेत.
सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे तसेच निरा उजवा कालव्याला पाणी नसल्याने अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद अवस्थेत आल्या आहेत.
आज पुणे येथील सिंचन कार्यालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पाणी सोडण्याच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख खपोले यांच्याकडे करण्यात आली.
डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी खपोले यांना पाणी सोडण्याचा जो कायदा आहे त्या कायद्याची आठवण करून दिली पाणी हे शेपटीकडुन म्हणजे टेल टु हेड सोडण्याचा कायदाच आहे परंतु तसे होत नाही
तसेच जे पाणी आपण सोडता ते पाणी पुर्ण क्षमतेने सोडत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे सध्या अनेक तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश आहे.
आशा तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे सांगोला तालुक्यात तर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा लागले आहेत..
हे टँकर भरण्याची व्यवस्था सुध्दा नाही कारण निराश उजवा कालव्याचे पाणी वेळे आगोदर बंद झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या योजना तर बंद आहेतच
परंतु टँकर सुध्दा भरणे मुष्किल झाले आहे... विशेषतः जनावरांच्या चाऱ्याची व जनावऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची भरपूर प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे..
आशा बिकट अवस्थेत लवकरात लवकर पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा असे मत डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले.
सदर बैठकीस आमदार मा.दिपक चव्हाण , पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष,डॉ भाई बाबासाहेब देशमुख,मा.धैर्यशील मोहिते पाटील,मा.उत्तमराव जानकर,मा.शहाजीराजे देशमुख,मा.दत्ताभाऊ टापरे
यांच्या सहित सर्वच तालुक्यातील नेते मंडळी व लाभधारक तालुक्यातील शेतकरी उपस्थित असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली
0 Comments