google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ! नोकरीचे आमिष दाखवून महिलांना दहा लाखांचा गंडा; दोन सख्ख्या भावांसह चौघांनी मिळून मर्चेंट नेव्हीतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची केली बतावणी सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक ! नोकरीचे आमिष दाखवून महिलांना दहा लाखांचा गंडा; दोन सख्ख्या भावांसह चौघांनी मिळून मर्चेंट नेव्हीतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची केली बतावणी सांगोला तालुक्यातील घटना..

खळबळजनक ! नोकरीचे आमिष दाखवून महिलांना दहा लाखांचा गंडा; दोन सख्ख्या भावांसह चौघांनी मिळून


मर्चेंट नेव्हीतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची केली बतावणी  सांगोला तालुक्यातील घटना..

दोन सख्ख्या भावांसह चौघांनी मिळून संगनमताने मर्चेंट नेव्हीतील बड्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे. मुलांना महिना ७० हजार रुपये पगाराचे मर्चेंट नेव्हीत

 नोकरीचे आमिष दाखवून पाच महिलांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये घेऊन सुमारे नऊ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली.

चौघांनी नोकरीच्या बहाण्याने मुलांना परराज्यात नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी कोंडून ठेवून ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार ६ जून ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला.

याबाबत सविता विलास चव्हाण (रा सोनंद ता सांगोला) यांनी मंगळवार २१ रोजी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोमनाथ शंकर जाधव, नवनाथ शंकर जाधव

 (दोघेही रा.सोनंद, रोहित पवार व सिद्धनाथ खबाले, दोघेही रा.महूद, ता. सांगोला) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी सविता चव्हाण यांचा मलगा प्रतीक हा बारावी पास झाल्यामुळे ते नोकरीच्या शोधात होते. जून २०२३ मध्ये गावातील सोमनाथ जाधव व नवनाथ जाधव या दोन

 भावांनी मुलगा प्रतीकच्या संपर्कात येऊन रोहित पवार आणि सिद्धनाथ खबाले (महूद, ता. सांगोला) यांचे नेव्हीमधील बड्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत.

त्यांच्या ओळखीने तला मर्चेंट नेव्हीमध्ये नोकरी लावतो त्यांनी आम्ही मिळून बऱ्याच लोकांना नोकरी लावल्याचे त्यास सांगितले.

सध्या मर्चेंट नेव्ही दिल्ली येथे एकच जागा असून, ७० हजार रुपये महिना पगार मिळेल, मुलाखतीत पास झाला तर नोकरी मिळेल आणि नाही पास झाला तर तुमचे सर्व पैसे परत मिळतील, असे सांगून फसवणूक केली

कोंडून ठेवून ठार मारण्याची धमकी

■ सोनंद गावातील बेबीताई चव्हाण, कौशल्या चव्हाण, नागर चव्हाण, शशिकांत जाधव यांच्या मुलांनाही नोकरी लावतो

 म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये घेतले व मुलांना परराज्यात नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून अन्न, पाणी न देता कोंडून ठेवले व पळून गेल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, चार महिन्यांनी प्रतीक हा रेल्वेने अचानक घरी आला. त्याने मला चार महिने कोंडून ठेवले होते. जेवण देत नव्हते, कोणाशी बोलू देत नसल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments