सांगोला तालुक्यात दुर्दैवी घटना..ट्रक्टर पलटी होवुन एकाचा जागीच मृत्यू
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):- ट्रक्टर पलटी होवुन सांगोला तालुक्यातील हणमंतगाव खांडेकरवस्ती येथे एकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना दि.०४ मे २०२४ रोजी ०१.३० वा चे सुमारास घडली.
अपघातामध्ये आमोल आगलावे (वय-३७) रा. आगलावेवाडी याचा दुर्दैवी अंत झाला. अपघाताची फिर्याद अक्षयकुमार आगलावे यांनी दिली आहे अपघाताबाबत अधिक माहिती अशी की,
दि.०४ मे २०२४ रोजी ०१.३० वा चे सुमारास अमोल आगलावे व शिवराज गावडे दोघे रा. आगलावेवाडी ता. सांगोला हे हणमंतगाव येथुन पाण्याची टाकी ट्रक्टरला जोडुन घेवुन येत होते.
दरम्यान खांडेकरवस्ती येथे ट्रक्टर पलटी होवुन अमोल आगलावे हा जागीच मयत झाला आहे. व शिवराज गावडे हा गंभीर जखमी झाला असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
0 Comments