google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज! राज्यात 'या' निवडणुकीची घोषणा

Breaking News

ब्रेकिंग न्यूज! राज्यात 'या' निवडणुकीची घोषणा

ब्रेकिंग न्यूज! राज्यात 'या' निवडणुकीची घोषणा


देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. आतापर्यंत पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले असून आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत. 

सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे. दरम्यान, आता महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत.

 जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार 26 जून रोजी मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 

तर एक जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूका जाहीर करण्यात आल्या होत्या. 

मात्र सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या ड्युटीवर शिक्षक असल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 

तर आता पुन्हा एकदा या निवडणुकीच्या घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या चार जागांसाठी दहा जून रोजी निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले होते. 

मात्र राज्यात अनेक शिक्षक लोकसभा निवडणुकीच्या ड्युटीवर असल्याने ही निवडणूक शाळा सुरु झाल्यानंतर घेण्यात यावी, अशी मागणी अनेकांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. 

दरम्यान आता मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघात 26 जून रोजी मतदान पार पडणार असून एक जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

Post a Comment

0 Comments