google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन, दारू पाजून रात्रभर अत्याचार तिघांवर गुन्हा दाखल

Breaking News

खळबळजनक..मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन, दारू पाजून रात्रभर अत्याचार तिघांवर गुन्हा दाखल

खळबळजनक..मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन, दारू पाजून रात्रभर अत्याचार तिघांवर गुन्हा दाखल


पुणे :पुण्यातील राजगुरुनगर मधून धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन नराधमांनी हवस भागवण्यासाठी ओळखीच्या दोन अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन त्यांना ड्रगचे इंजेक्शन दिले . 

तसेच लॉजवर नेऊन बिअर आणि दारु प्यायला देऊन रात्रभर त्या मुलींवर अत्याचार केला.आरोपींनी अल्पवयीन मुलींचे अक्षरश: लचके तोडल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार खेड तालुक्यात घडला आहे.

 याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.14) रात्री घडला आहे.

आरोपींवर खेड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे. तर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार फरार झाला 

असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. यामध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी हा ड्रग्स पुरवणारा सुत्रधार असून त्याने आतापर्यंत किती जणांना ड्रग्ज पुरवले आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, मंगळवारी रात्री आरोपींनी दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्स दिले.बुधवारी सकाळी नशेत झिंगलेल्या मुली आपल्या घरी परतल्या त्यावेळी त्यांच्या पालकांच्या लक्षात ही बाब आली.

त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.राजगुरुनगर परिसरात राहणारे आणि महाविद्यालयात शिकत असलेली ही मुले, मुली आहेत.

त्यांच्या या प्रकाराची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.यासंदर्भात पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments