सांगोला - धायटी ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो २० मे रोजी ग्रामस्थांचे सांगोला तहसील कार्यालयासमोर आंदोलन, ग्रा.पा.पु.उप अभियंता कमळे यांनी दिला चुकीचा अहवाल
सांगोला:- धायटी ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो २० मे रोजी ग्रामस्थांचे सांगोला तहसील कार्यालयासमोर आंदोलन, ग्रा.पा.पु.उप अभियंता कमळे यांनी दिला चुकीचा अहवाल
सांगोला (प्रतिनिधी):- वाडय रस्त्यांवरील जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील धायटी ग्रामस्थांनी टँकरच्या खेपा वाढविण्याची मागणी करीत टँकरच्या खेपा न वाढविल्यास
सांगोला तहसील कार्यालयासमोर दिनांक २० मे पासून स़रपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
तशा आशयाचे निवेदन धायटी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वातीताई नवनाथ येडगे यांनी तहसीलदार सांगोला यांना दिले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी फक्त गावठाण हद्दीत उपलब्ध होत असून धायटी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्यावस्त्यांवरील नागरीकांना पाणी
टंचाईच्या प्रचंड झळा बसत असून जनावरे आणि माणसांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतो आहे.
पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी धायटी ग्रामपंचायतीच्या वतीने वाड्यावस्त्यांवर टँकर सुरू करण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव देऊन देखील टँकरच्या केवळ दोन खेपा होत आहेत.
या दोन टँकरच्या खेपातून वाड्या वस्त्यांची तहान भागत नसून टँकरच्या खेपा वाढवून मिळाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग
सांगोलाचे उप अभियंता सुरेश कमळे यांनी धायटी ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचा चुकीचा अहवाल दिल्याने टँकर खेपा वाढवून मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे.
जल जीवन मिशनची धायटी येथील कामे अपूर्ण असून त्यांना ती योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली
नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. उप अभियंता सुरेश कमळे यांनी यांनी हेतूपुरस्सर चुकीचा अहवाल दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
टँकरच्या वाढीव खेपा न दिल्यास दिनांक २० मे पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांसहीत बेमुदत उपोषणाचा इशारा सरपंच स्वातीताई नवनाथ येडगे यांनी दिला आहे.
0 Comments