google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विरोधक करत असलेल्या टीकेवरून धैर्यशील मोहिते-पाटील यांना अधिकच प्रतिसाद

Breaking News

विरोधक करत असलेल्या टीकेवरून धैर्यशील मोहिते-पाटील यांना अधिकच प्रतिसाद

विरोधक करत असलेल्या टीकेवरून धैर्यशील मोहिते-पाटील यांना अधिकच प्रतिसाद


अकलूज (प्रतिनीधी):- सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न आणि आपले हात नेहमी रिकामे ठेवून अनेकांचे संसार फुलवणारे 

दयावान म्हणून परिचित असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी मधून माढा लोकसभा मतदारसंघात उभे आहेत त्यांच्या उमेदवारीला 

सर्व मतदार संघातून अद्वितीय प्रतिसाद मिळत असताना विरोधक मात्र खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसत आहेत यावरूनच विरोधकांनी हात टेकलेले दिसत आहेत. 

विरोधक करत असलेल्या टीकेवरून जनता जनार्दन अधिकच संताप व्यक्त करताना दिसत असून याचा परिणाम म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना अधिकच प्रतिसाद वाढताना दिसतो आहे.

चार आमदार, एक पालकमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांची सभा इतकी मोठी फौज आणि ताकद

 महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात लावून सुद्धा जनमताच्या रेट्यापुढे महायुतीचे उमेदवार कमजोर झालेले दिसत आहेत 

आणि यातूनच ते वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. विकासाचे मुद्दे राहिले बाजूला पण महायुतीची मंडळी वैयक्तिक मोहिते पाटलांचे गुन्हे व इतर काही गोष्टी काढून 

मतदारांत संभ्रमावस्था निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न करताना दिसत आहेत. मोहिते पाटील समजायला सुजाण नागरिक व्हावं लागतं असा टोला या निमित्ताने जनता लगावताना दिसत आहे.

अगदी सहकार महर्षीच्या काळापासून ते आजपर्यंत मोहिते पाटील परिवाराने जो कार्याचा आलेख उंचावत ठेवला आहे सर्वसामान्यांचे अश्रूत्यांनी पुसण्याचे काम आजपर्यंत केलेले आहे. 

जनतेबरोबर मोहिते पाटलांचे ऋणानुबंध इतके घट्ट झाले आहेत की ते अशा बिनबुडाच्या आरोपाने सैल होतील असे कदापिही घडणार नाही. याउलट मोहिते पाटील यांना कोणी बोलली 

की याचा फायदा मोहिते पाटलांना जास्त होतो असाही आजपर्यंत राजकीय इतिहास आहे. फक्त माढा लोकसभा मतदारसंघातच नाही तर शेजारील सोलापूर, 

बारामती अशा मतदारसंघात सुद्धा मोहिते पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे. मागील चाळीस-पन्नास वर्षाच्या राजकारण समाजकारणात मोहिते पाटलांनी जी माणसे कमवली आहेत 

ती अशा विरोधकांच्या टीकेने कमी होणारी नाहीत ही वस्तुस्थिती आहे. सहकार महर्षी नंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी जे कार्याचे जाळे निर्माण केले आहे ते लोकांना भावले आहे 

आणि त्यानंतरच्या काळात रणजीतसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या बंधूंनी ही परंपरा जपून जनमानसात जाऊन ही करायची परंपरा जपली आहे. त्यामुळेच लोक मोहिते पाटलांवर फिदा आहेत. 

आता धैर्यशील मोहिते पाटील हे माढाच्या रणांगणात महाविकास आघाडी करून उभे असताना सर्व स्तरातून त्यांना पाठिंबा दिसतो आहे. अशा अवस्थेत विरोधक मंडळी मात्र हताश आणि

नैराश्यातून वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका टिप्पणीकरताना दिसत आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, 

स्वतः उमेदवार असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि अन्य काही मंडळी मोहिते पाटलांचा समाचार घेताना दिसत आहेत. 

मोहिते पाटील उभे राहण्यापूर्वी हीच मंडळी मोहिते पाटील आमचे आहेत असे म्हणत होती आता मात्र खालच्या पातळीवर जाऊन बोलताना दिसत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे एक वेगळे रसायन आहे 

आजपर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांना, जनमताला सर्वस्व मानले. आज हजारो युवक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून संसार सुखाने चालताना दिसत आहेत. 

विविध क्षेत्रात त्यांनी तरुणाईला संधी दिली आहे त्याची उदाहरणे ताजी आहेत. शिक्षण कला सामाजिक क्षेत्रात त्याचे अनमोल योगदान आहे. 

पण हे सर्व कार्य विरोधकांना कसे दिसणार हा खरा सवाल आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे व्यक्तिमत्व समजून घ्यायला हवे. त्यांच्या मनात असणाऱ्या संकल्पना, 

देशाविषयी असणाऱ्या तेजोमय भावना व लोक विकासाच्या योजना यामुळे हे व्यक्तिमत्व संसदेत जावे ही जनमताची भावना आहे. त्यामुळे काहीतरी काढून टीका टिप्पणी करता येते 

मात्र व्यक्तिमत्त्व समजून घ्यायला मनाची तयारी असावी लागते ती विरोधकांकडे दिसत नाही त्यामुळेच धैर्यशील मोहिते पाटलांच्या तुतारीचा जोर मतदार संघात वाढताना दिसतो आहे.

चौकट 

आ. शहाजीबापूंच्या टिकेला फुल म्हणून स्वीकारले...

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील सध्या मोहिते पाटलावर घसरताना दिसत आहेत मात्र या टीकेवर सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांनी ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या तोंडात नेहमी सरस्वती असते असे म्हणत 

त्यांच्या टिकेचा मी फुल महणून स्वीकार करतो असे उत्तर दिले. त्यामुळे धर्यशील मोहिते पाटील समजून घेताना त्यांच्यातील असणाऱ्या गुणतत्वांचा अभ्यास करायला हवा.

 टीका करणाऱ्यांनी एकडे ध्यानात घेतले पाहिजे की ते जितकी टीका करतील तितकेच घेर्यशील मोहिते पाटलांचे नेतृत्व तेजोमय होत राहणार आहे.

Post a Comment

0 Comments