धक्कादायक.. सोलापुरातील तरुणाचा गोव्यातील प्रसिद्ध बीचवर मृत्यू, मित्रावर गुन्हा दाखल
मद्यधुंद अवस्थेत रात्रभर गाडीतच झोपलेल्या सोलापूर येथील पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना कळंगुट येथून समोर आली आहे.
14 एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. कळंगुट पोलिस स्थानकात याप्रकरणी मृताच्या मित्रावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे
शिंदे (28, रा. संजयनगर सोलापूर) असे मृत पर्यटकाचे नाव असून, पोलिसांनी सोनी याचा मित्र संशयित सिद्धेश माद्रे (40, सोलापूर) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.
सोनीचे काका किरण शिदि यांनी याबाबत तक्रार दिली असून, माद्रे याच्याविरुद्ध भा.दं.सं.च्या 304 अ कलमांतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी शिंदे, सिद्धेश्वर माद्रे आपल्या इतर दोन मित्रांसोबत KA 28 MA 1745 या कारमधून गोव्यात पर्यटनासाठी आले होते.
शुक्रवार, दि.12 एप्रिल रोजी ते कळंगुट येथे दाखल झाले. कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये ते चौघे उतरले होते.
शनिवारी दि.13 एप्रिल रोजी रात्री सर्वांनी एकत्र जेवण केले. तिथे त्यांनी मद्यपानही केले. सोनी याला दारुचे प्रमाण जास्त झाल्याने तो गाडीतच झोपला.
इतर सहकाऱ्यांनी खोलीवर नेण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्यासोबत आला नाही. त्यामुळे संशयित सिद्धेश्वर याने कारचे सर्व दरवाजे लॉक केले व ते तिघेही खोलीवर जाऊन झोपले.
दरम्यान, दुसर्या दिवशी सोनी शिंदे दुपारपर्यंत गाडीतच झोपून होता. मित्रांनी गाडीचे दरवाजे उघडले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता.
त्याला तात्काळ कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बंद कारमध्ये गुदमरून त्यातच हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी पुढील तपास करीत आहेत.
0 Comments