खळबळजनक... सांगोला शहरात भर दिवसा चोरट्यांनी पळविला ३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून कपाटात ठेवलेले
८२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १७० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या
सुमारास एखतपूर रोडवरील सिध्दीविनायक अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी सीमा सातारले यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगोला शहरातील एखतपूर रोडवरील सिध्दीविनायक अपार्टमेंट मध्ये सीमा सातारले या कुटुंबासह राहण्यास आहेत.
२० एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास फिर्यादीचे पती स्वप्नील हे दुकानात गेले होते तर मुलगा प्रतिक कामाला गेला होता.
दुपारी दोनच्या सुमारास सिमा सातारले या घराचा दरवाज्या समोर करून पती स्वप्नील यांना दुकानात जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास त्या घरी परत आल्या
असता त्यांना घराचा दरवाज्या उघडा दिसला. त्यावेळी त्यांनी घरात जावून पाहिले असता घरातील व कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
त्यांना घरातील कपाटात ठेवलेले रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने दिसून आले नाहीत. कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागीने व रोख रकम कोणातरी अज्ञात चोरट्याने चोरून
निल्याची त्यांची खात्री झाली. तसेचचोरट्याने शेजारी राहणारे राजकुमार कांबळे यांच्या घरीही चोरी करून रोख रक्कम आणि चांदीचे दागिने चोरून नेल्याचे समजले.
अज्ञात चोरट्याने सीमा सातारले यांच्या घरातील १ लाख ८० हजार रुपये किमतीची ६० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीची
५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २१ हजार रुपये किमतीचे ७० ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे, देवाचे तबक, निरंजण पंचपाळे, ३० हजार रुपये किमतीचे १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे गणपती,
श्रीकृष्ण, अन्नपूर्णा, निरंजन, २८ हजार रुपये रोख रक्कम असा ३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सीमा सातारले यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
0 Comments