google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना..चोरट्यांनी टमटममधून दीड लाख घेऊन ठोकली धूम

Breaking News

सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना..चोरट्यांनी टमटममधून दीड लाख घेऊन ठोकली धूम

सांगोला तालुक्यातील खळबळजनक


घटना..चोरट्यांनी टमटममधून दीड लाख घेऊन ठोकली धूम

सांगोला : पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी चालक टाकीचे टोपण काढण्यासाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी टमटमच्या केबिनमधून एक लाख ५८ हजारांची रोकड असलेली

 पिवळ्या रंगाची पिशवी काढून दुचाकीवरुन धूम ठोकली. चालकाला काही समजण्याच्या आत हा प्रकार घडल्याने पंपावर गोंधळ उडाला होता.

ही घटना गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास कमलापूर-अजनाळे रोडवर एका पेट्रोल पंपावर घडली. याबाबत तानाजी अंकुश मिसाळ (रा. चिणके, ता. सांगोला) यांनी अनोळखी दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

 चालक-मालक तानाजी मिसाळ हा तरुण चिणके व यलमर मंगेवाडी गावातून दूध गोळा करुन मानेगाव येथील खासगी संघाला घालतो. 

दरम्यान, १८ एप्रिल रोजी दुपारी तानाजी मिसाळ याने दुधाच्या पगाराचे एक लाख ६० हजार रुपये घेऊन ते पैसे पिवळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेऊन

 ती टमटमच्या (एमएच ४५ एएफ ९५२६) केबिनमध्ये दोन सीटच्या मध्ये ठेवली होती. वाटेतकिराणा दुकानातून १२०० रुपयांचा किराणा माल

 घेऊन कमलापूरमार्गे चिणकेकडे निघाला होता. त्यादरम्यान अजनाळे रोडवर एका पेट्रोल पंपावर दुपारी दोनच्या सुमारास डिझेला टाकण्याकरिता टमटम थांबवून 

टाकीचे टोपण काढण्यासाठी तो खाली उतरला. हीच संधी साधून २० ते २५ वयोगटातील एका चोरट्याने टमटमच्या डाव्या बाजूने केबिनमध्ये हात

 घालून एक लाख ५८ हजार रुपये रोकड असलेली पिशवी उचलली.. दरम्यान, टाकीचे टोपण काढून तानाजी पुन्हा केबिनकडे आला असता त्याला अनोळखी

 मुलगा दुचाकीवर थांबलेल्या अनोळखी मुलाच्या दुचाकीवर बसून दोघेजण वेगाने कमलापूरकडे निघून गेले. या चोरीचा गुन्हा सांगोला पोलिस ठाण्यात दाखला झाला आहे.

Post a Comment

0 Comments