मोठी बातमी..डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे सांगोला शहरातील बॅनर फाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
सांगोला -प्रतिनिधी सांगोला शहरातील जय भवानी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लावण्यात आलेले
तीन बॅनर सात ते दहा लोकांनी फाडले म्हणून काही काळ गुरुवारी रात्री नऊ वाजता गोंधळ निर्माण झाला.
पोलिसांच्या तत्परतेमुळे त्वरित शांतता निर्माण झाली असून सदर बॅनर फाडणाऱ्या दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सांगोला शहरामध्ये रामनवमी निमित्त मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.
14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात चौका चौकात अभिवादनाचे बॅनर लावले होते.
सदर मिरवणूक जय भवानी चौकात आल्यानंतर भीम नगर सांगोला येथील फिर्यादी रामचंद्र सुरेश बनसोडे व त्याचे मित्र सुबोध दिलीप आठवले राहणार
चिंचोली रोड सांगोला हे फिरण्यासाठी सांगोला शहरात गेले होते कशाचा आवाज येतो म्हणून चौकशी केली असता रामनवमीनिमित्त मिरवणूक निघाली आहे त्याचा आवाज येत होता.
तेथे गेले असता त्यांच्या ओळखीचे दीपक उर्फ गुंडा खटकाळे राहणार वासुद अकोला, मयुरेश गुरव सांगोला, अक्षय पवार राहणार आलेगाव, महेश चौधरी पुजारी वाडी सांगोला,
संतोष भोसले वासूद रोड सांगोला, राहुल देवकर सांगोला, चैतन्य कोवाळे राहणार सांगोला, हे जय भवानी चौकात होते तेथे आले.
असता गुंडा खटकाळे असे म्हणत होता की डॉक्टर आंबेडकर जयंती संपलेली आहे
आता त्यांचे बॅनर कशाला ठेवले आहेत, चला आपण सर्व मिळून बॅनर फाडून काढू असे सांगितले.
हे सात जण व इतर तिघेजण मिळून दहा लोकांनी एकत्र येऊन तीन बॅनर भावना दुखावण्यासाठी च्या उद्देशाने फाडून सुमारे बाराशे रुपयांचे नुकसान केले
त्यामुळे गोंधळ सुरू झाला. गोंधळ होताच गुंडा खटकाळे सह बरोबर असलेले.
सहा जण निघून गेले तेवढ्यात सब पोलीस इन्स्पेक्टर जगताप हवालदार भरम शेट्टी हे तेथे आले व त्यांनी परिस्थित नियंत्रणात आणली.
सदर प्रकरणानंतर पोलीस अधिकारी यांनी शांतता कमिटीची बैठक बोलावली.
शांततेचे आवाहन केले शांतता निर्माण झाल्यानंतर रामचंद्र बनसोडे यांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली
सध्या तरी शहरात बंदोबस्त मागवण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.
0 Comments