शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन.
सामान्य जनतेला संघटित होण्याची व संघर्ष करण्याची शिकवण डॉ आंबेडकरांनी दिली :-प्रा. डॉ प्रकाश बनसोडे
सांगोला (प्रतिनिधी) शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
सामान्य जनतेला संघटित होण्याची व संघर्ष करण्याची शिकवण डॉ आंबेडकरांनी दिली.भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता
या तत्त्वांचा ठळकपणे उल्लेख होण्यामागे बाबासाहेबांचा हाच विचार प्रभावीपणे दिसत असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे सर यांनी केले, ते सांगोल्यातील
शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त केले.
सुरुवातीस स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे प्रा डॉ. प्रकाश बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण समर्पित करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा डॉ. प्रकाश
बनसोडे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करून जयंती निमित्त अभिवादन केले.
तसेच सांगोला महाविद्यालयाच्या प्रोफेसर पदी पदोन्नती झाल्याबद्दल अशोक कामटे संघटनेच्यावतीने उद्योगपती बाळासाहेब टापरे सर यांनी सत्कार करून सन्मान करून शुभेच्छारुपी संदेश मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रदीप बनसोडे सर, एडवोकेट हर्षवर्धन चव्हाण,
मकरंद पाटील,प्रा. विजय पवार, प्रताप (आबा)इंगोले, सुयोग बनसोडे यांनी जयंती निमित्त अभिवादन करून मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. प्रसाद खडतरे ,सूत्रसंचालन नीलकंठ शिंदे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहीद अशोक कामटे संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
यांच्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सामान्य जनतेला संघटित होण्याची व संघर्ष करण्याची शिकवण त्यांनी दिली. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
0 Comments