google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश

Breaking News

मोठी बातमी...धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश

मोठी बातमी...धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश


लोकसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. 

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील कुटुंब पुन्हा एकदा शरदचंद्र पवारांबरोबर आले आहे. विजयदादा यांचे पुतणे धैर्यशील मोहिते हे आता माढा मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर

 निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. तर मोहिते कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर माढा,

 सोलापूर, बारामती या ३ मतदारसंघाचे राजकीय चित्र पलटणार आहे. दरम्यान शरदचंद्र पवार यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. 

मोहिते पाटील हे महाविकास आघाडीत आल्यानंतर याचा राज्यभरात संदेश जाईल. राज्यभर परिणाम होईल. त्यातून महाविकास आघाडीच्या जागा वाढतील, असे पवार यांनी म्हटले आहे.

 शरदचंद्र पवार, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील व इतर नेते आज अकलूजमध्ये होते.

 शरदचंद्र पवार म्हणाले, माढा मतदारसंघातून धैर्यशील हे निवडणूक लढविणार आहेत. ते १६ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

तसेच माढा, सोलापूरमध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला आहे. सोलापूर जिल्हा पुरोगामी विचाराचा आहे. हा जिल्हा गांधी व नेहरु यांच्या विचारांना मानणारा आहे. 

त्यामुळे सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि माढातून धैर्यशील हे मोठ्या मतांनी विजयी होतील, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. मोहिते कुटुंब आमच्याबरोबर आल्याने माढा, 

सोलापूर, बारामती लोकसभा मतदार संघावर परिणाम होईलच. तसेच या निर्णयाचा संदेश या ३ मतदारसंघात सीमित राहणार नाही. हा राज्यात संदेश जाईल, असे पवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments