google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग! माढयाचा तिढा सुटला, पण पेच वाढला

Breaking News

ब्रेकिंग! माढयाचा तिढा सुटला, पण पेच वाढला

ब्रेकिंग! माढयाचा तिढा सुटला, पण पेच वाढला


देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोठी तयारी केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे.

 दरम्यान, माढा लोकसभेत धैर्यशील मोहिते यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानंतर शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप यांनी बंडाची तयारी केली आहे. 

मात्र, आज जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर निवडणुकीबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज होऊन बंडखोरीची तयारु सुरु केलेले जगताप यांनी पवारांची भेट घेतली. ते माढा लोकसभेसाठी इच्छुक होते. धैर्यशील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगताप नाराज झाले होते. 

माढा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी भरू नये, अशी विनंती काल जयंत पाटील यांनी केली होती. 

जगताप हे दोन दिवसात निर्णय घेणार आहे. आज राजू शेट्टींची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जगताप शरद पवार गट सोडण्याच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments