google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पिलीव येथील सोमनाथ बुगड गुरुजी यांचे मरणोत्तर नेत्रदान

Breaking News

पिलीव येथील सोमनाथ बुगड गुरुजी यांचे मरणोत्तर नेत्रदान

पिलीव येथील सोमनाथ बुगड गुरुजी यांचे मरणोत्तर नेत्रदान


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी )- जि. प. प्रा. शाळा जरगवस्ती (पिलीव) येथील आदर्श शिक्षक व पिलीव गावचे रहिवासी

 श्री. सोमनाथ अरुण बुगड ( वय ४७) यांचे १६ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार  नातेवाईकांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान केले. 

 त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, दोन बंधु, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.सांगोला कॉलेजमधील प्रा. डॉ.रमेश बुगड यांचे ते बंधू होते. ते अतिशय मनमिळाऊ, हुशार व उत्कृष्ट शिक्षक होते. 

आपल्या कार्यकाळात आपल्या प्रभावी अध्यापनाने त्यांनी अनेक आदर्श वि‌द्यार्थी घडवले. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना शैक्षणिक कार्याबरोबरच शेतीची विशेष आवड होती.

मरणोत्तर नेत्रदानासाठी आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांचे सहकार्य लाभले व अकलूज येथील डॉ. महाडिक व डॉ. गिरीश आर्वे यांनी नेत्रदानास मदत केली.

आपुलकीच्या चळवळीला प्रतिसाद

 सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठान गेले पाच वर्षापासून नेत्रदान, देहदान व अवयवदान चळवळ राबवत असून आतापर्यंत तीन व्यक्तींनी नेत्रदान करून आपुलकीच्या या चळवळीला प्रतिसाद दिला आहे. 

मरणोत्तर नेत्रदानाने दोन अंधांना दृष्टी मिळण्यास मदत होते, तेव्हा मरणोत्तर नेत्रदानासाठी आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला यांचेशी ( ९०११७०७०८०) संपर्क साधावा

राजेंद्र यादव, अध्यक्ष, आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला.

Post a Comment

0 Comments