प्रा. अंजली जाधव यांच्या" देवमाणूस ..एक कथा"या शॉर्ट फिल्मचे शूटिंग निर्विघ्नपणे संपन्न
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी /समाधान मोरे प्रा. अंजली जाधव यांच्या तृतीयपंथी लोकांच्या जीवनावर आधारित"
देव माणूस.. एक कथा" या शॉर्ट फिल्मचे शूटिंग कोळा जुनोनी व आजूबाजूच्या परिसरात निर्विघ्नपणे झाले आहे.
प्रा. अंजली जाधव यांनी' देव माणूस' ही शॉर्ट फिल्म लिहिली आहे, त्यामध्ये मुख्य नाईका म्हणून त्यांनी भूमिका पण केली आहे
व त्या या शॉर्ट फिल्मच्या निर्मात्या पण आहेत. ही शॉर्ट फिल्म तृतीयपंथी लोकांच्या जीवनावर आधारित आहे
या शॉर्ट फिल्ममध्ये प्राध्यापिका अंजली जाधव ,विजय मासाळ, संग्राम काटे ,निलेश शिंदे ओंकार काकडे, सौरभ होनमाने ,रॉकी गायकवाड, अजय , बालकलाकार अथर्व या कलाकारांनी काम केले आहे.
श्री संग्राम काटे फिल्मस प्रोडक्शन अंतर्गत या शॉर्ट फिल्म चे शूटिंग चे काम पूर्ण झाले आहे . श्री संग्राम काटे फिल्मस प्रोडक्शन अंतर्गत या शॉर्ट फिल्म चे काम पूर्ण झाले आहे
.यासाठी जुनोनी विद्यालय जुनोनी, दीपक आबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेज कोळे संस्थापक अध्यक्ष माननीय दीपक माने , माननीय डॉ. महेश कोरे
आधार हॉस्पिटल जुनोनी, विलास हॉटेल जुनोनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समाजामध्ये तृतीयपंथी लोकांना मानाचे स्थान मिळावे व त्यांना एक माणूस म्हणून जगताना कोणतीही अडचणी येऊ नये हा
या शॉर्ट फिल्म बनवण्याचा मुख्य उद्देश आहे असे प्रा. कु. अंजली जाधव यांनी आपले मत मांडले आहे. या शॉर्ट फिल्म साठी श्री संग्राम काटे मुख्य दिग्दर्शक, ओंकार काकडे सह दिग्दर्शक ,
श्री प्रफुल मनवार कॅमेरामन , निलेश शिंदे प्रोडक्शन मॅनेजर यांनी खूप मेहनत घेतली आहे. या शॉर्ट फिल्मच्या यशस्वीपणे झालेल्या शूटिंगसाठी कमी वयात आकाशाला गवसणी घालणाऱ्या
व फिल्मी दुनियेत एक आपलं वजनदार अस्तित्व निर्माण करणाऱ्या संग्राम काटे व त्याच्या टीम साठी कोळा व जुनोनी परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Comments