माढा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. भीमक्रांती संघटनेचे नेते इंजि बळीराम मोरे यांचा होम टू होम प्रचार
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
भीमक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे नेते इंजि. बळीराम सुखदेव मोरे हे 43 माढा लोकसभा
मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.त्यांना 'पेनाचे निब' (सात किरणासह) हे निवडणुक चिन्ह मिळाले आहे.
इंजि. बळीराम सुखदेव मोरे सांगोला तालुक्यातील सोनलवाडी येथील रहिवाशी असून भीम क्रांती संघटनेच्या माध्यमातून दलित, शेतकरी,वंचित व बहुजन समाजातील लोकांसाठी काम करीत आहेत.
त्यांनी अनेक प्रकारची आंदोलने धरणे, उपोषण यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने केली आहेत.
त्यांनी यापूर्वी माढा मतदार संघातून सन 2014 मध्ये निवडणूक लढवली आहे.त्यांना चांगले मतदान झाले होते.
इंजि. बळीराम मोरे यांनी होम टू होम प्रचार सुरु केला आहे. त्याला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
0 Comments