google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उमेदवारांनो खबरदार! लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'ही' वक्तव्य कराल तर...; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा कारवाईचा इशारा

Breaking News

उमेदवारांनो खबरदार! लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'ही' वक्तव्य कराल तर...; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा कारवाईचा इशारा

उमेदवारांनो खबरदार! लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 'ही' वक्तव्य कराल तर...; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा कारवाईचा इशारा 


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कोणाची मानहानी होणारी, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत, 

अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. तरीही काही नेतेमंडळी भावनेच्या भरात जातीधर्मावर बोलत आहेत.

याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्या भाषणाची व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिप थेट निवडणूक आयोगाकडे पाठवून दिली जाणार आहे, 

असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरात ‘भाजपा’च्या उमेदवारांनी एका धर्माबद्दल वक्तव्य केल्याबाबत दोन तक्रारी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.

।त्यावरुन ‘त्या’ भाषणाची ऑडीओ आणि व्हिडीओ क्लिप थेट निवडणूक आयोगाला पाठवून देण्यात येणार आहे. 

त्यामुळे प्रचार आणि भाषण करताना कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावतील अथवा कोणाचीही मानहानी होईल अशी वक्तव्य करु नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

दोनपेक्षा अधिक मतदारसंघात अर्ज; ‘त्या’ उमेदवाराविरुध्द कारवाई

एका व्यक्तीला दोनपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवता येत नाही. मात्र, व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी सोलापूरसह नागपूर, अमरावती आणि कर्नाटक अशा चार ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला.

Post a Comment

0 Comments