भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय बापू बनसोडे यांचा
माढा लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांना बिनशर्त पाठिंबा
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- माढा लोकसभा मतदारसंघांचे महायुतीचा उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उपुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची सांगोला येथे जाहीर सभा संपन्न झाली.
यावेळी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.व्यासपीठावर आ.शहाजी पाटील, मा.आ.प्रशांत परिचारक, मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील उपस्थित होते.
माढा लोकसभा निवडणूकीत भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू बनसोडे यांनी सांगोला शहरात माढा लोकसभा निवडणूकी विषय जाहीर सभा संपन्न झाली.
त्या सभेत भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय बापू बनसोडे यांनी आपल्या संघटनेचा पाठिंबा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पाठिंबा दिला.
तसेच भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य माढा लोकसभा निवडणूक उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांना
भरघोस मताने निवडून आणण्याचा निश्चय करीत पाठिंबाचे पत्र दिले शाहू फुले आंबेडकर चळवळीच्या माध्यमातूनसमाजातील शोषित, पिढीत, वंचित,
उपेक्षित भटक्या विमुक्त अल्पसंख्यांक मागासवर्गीय बेरोजगार शेतकरी कष्टकरी मातंग समाजातील तरुणांना बेरोजगार मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो
गरीब मुलांना नोकरी मिळत नाही शिक्षणाला आर्थिक मदत होत नाही कामगार घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी गेले कित्येक वर्षे संघटना काम करत आहे.
भीमशक्ती संघटना महाराष्ट्रभर काम करत आहे तरी गोरगरीब शेतकरी पिढीत नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संघटना काम करत आहे.
संघटना बळकट करण्यासाठी व त्याला न्याय मिळवून घेण्यासाठी संघटनेने हा निर्णय घेतला आहे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस
माढा लोकसभा उमेदवार मा. रणजीतसिंह निंबाळकर साहेब आमदार शहाजी बापू पाटील दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याशी चर्चा करून
संघटनेला विश्वासात घेतलं असून संघटनेच्या आडचणी सोडवण्याचे काम करू त्यांना मदत करू असे आश्वासन व विश्वासात घेऊन काम करण्याचा शब्द दिल्याने.
सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला व त्या अनुषंगाने बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सांगोला तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments