google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक!पंढरपूर - मिरज रस्त्यावर भयंकर अपघात, चौघांचा मृत्यू तर कित्येक जखमी

Breaking News

धक्कादायक!पंढरपूर - मिरज रस्त्यावर भयंकर अपघात, चौघांचा मृत्यू तर कित्येक जखमी

धक्कादायक!पंढरपूर - मिरज रस्त्यावर भयंकर अपघात, चौघांचा मृत्यू तर कित्येक जखमी


 मंगळवेढ्यातील ऊस तोड कामगार राबराब राबले पण घरी परतलेच नाहीत;

 4 ऊस तोड मजुरांचा मृत्यू तर 10 जण जखमी ऊस तोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून

 ट्रकने दिलेल्या धडकेत मंगळवेढा तालुक्यातील ऊसतोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला. 

तर तब्बल 10 जण जखमी झाले आहेत मृतातील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे.

मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर (वय 30 रा.शिरनांदगी), जगमा तम्मा हेगडे (वय 35), दादा आप्पा ऐवळे (वय 17), निलाबाई परशुराम ऐवळे (वय 3)

 रा.चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला व आणि 10 जखमी आहेत जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.

सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर नागज फाट्याजवळ पहाटे 4 च्या दरम्यान घडली या घटनेतील सविस्तर माहिती अशी की, त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते.

येथील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणी साठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना

 मध्यरात्री रात्री दोन वाजता ट्रॅक्टर मध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता पाठीमागून आलेल्या आंध्रप्रदेशातील ट्रकने हा अपघात झाला.

चिक्कलगी व शिरनांदगीत शोककळा

या अपघाताची वृत्त समजतात चिक्कलगी व किंवा शिरनांदगी या गावावर शोककळा पसरली असून मयत मजूर व त्यांचे नातेवाईक हे परिस्थितीने 

गरीब असल्यामुळे त्यांना उपचारासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील व गुलाब थोरबोले यांनी पहाटेची घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments