'हे म्हातारं लय खडूस, किल्ली कमरेला...', शरद पवारांवर बोलताना सदाभाऊंची फटकेबाजी
सांगोला : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या
प्रचारासाठी सदाभाऊ खोत आले होते. या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर घणाघाती टोला लगावला आहे.
'हे म्हातारं लय खडूस हाय, तिजोरीची किल्ली कमरेला लावून फिरतंय, अजितदादा किल्लीकडे बघून म्हातारे झाले. म्हातारं काय किल्ली देत नाही', अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली आहे.
'म्हातारं किल्ली देत नाही, हे दादाच्या लक्षात आलं, त्यामुळे दादा आता किल्लीला लोंबकळत आहेत, किल्ली तोडल्याशिवाय दादा शांत बसणार नाही',
अशी फटकेबाजी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सांगोला तालुक्यातील कोळे येथील सभेत सदाभाऊ खोत बोलत होते.
'ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा आहे. ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापीत अशी आहे. पवार साहेबांचं वय 84 आणि सभा 84 घेणार आहे.
आता साहेबाला काय काम आहे? काय मसरं राखायचं आहे, का पाणी पाजायचं आहे.
ह्योच धंदा करायचा आहे. पोरगं मोठं झालं की बाप प्रपंच त्याच्या हातात देतं आणि गप बसतं. पण हे म्हातारं खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय. अजितदादा किल्लीकडे बघून बघून म्हातारं झालं.
अजितदादाच्या लक्षात आलं हे म्हातारं कंबरेची किल्ली काढत नाही. दादा आता लोंबकळत म्हणतंय, आता किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही', अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
'आम्हालाबी प्रपंच करू द्या, म्हातारं झाल्यावर प्रपंच करायचा का? म्हणून दादा विकासासाठी भाजपसोबत आले', असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
आव्हाडांचा पलटवार
दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या या टीकेवर जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे. 'यांनी शरद पवारांचं घर फोडलं, चोरी केली, दरोडा टाकला. लटकवलेली चावी कोण नेतं? पाकीटमार.
त्यामुळे हे पाकीटमार आहेत. आमचं घड्याळ कोणी चोरलं? ट्रेनमधून जाताना घड्याळ कोण चोरतो? पाकीटमार. आमचा पक्ष कुणी चोरला, दरोडेखोर,' असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.
0 Comments