सांगोला तालुक्यात वाकीघेरडी येथे तारांचे घर्षण होऊन व डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्याची डाळिंब बाग जळून खाक
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२
डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन व डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन वाकीघेरडी (ता. सांगोला) येथील सुरेश झिंजुरटे या शेतकऱ्याची डाळिंब बाग जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता.५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
सांगोला तालुक्यातील वाकी घेरडीसह परिसरातील महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तार खूप जीर्ण झाल्या असून, त्या केव्हाही तुटतात.
तारांचे घर्षण होऊन आगीच्या घटना घडल्याने शेतातील पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे अनेक वेळा आर्थिक नुकसान झाले आहे.
तसेच विद्युतपुरवठा खंडित झाल्याने विद्युत प्रवाह पुन्हा सुरू करण्यासाठी एक दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन व डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन
वाकी (घेरडी, ता. सांगोला) येथील सुरेश झिंजुरटे या शेतकऱ्याची डाळिंब बाग जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) दुपारी तीन वाजणेच्या सुमारास घडली.
या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. डाळिंब बाग जोपासण्यासाठी झिंजुरटे कुटुंबीयांनी खूप मेहनत घेतली होती.
उन्हातान्हात कष्ट तर केलेच, शिवाय झाडा़ंना फळधारणा व्हावी, म्हणून रासायनिक खते व औषधासाठी उसनवारी करून मोठा खर्च केला होता. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन व डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन वाकीघेरडी (ता. सांगोला) येथील सुरेश झिंजुरटे या शेतकऱ्याची डाळिंब बाग जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता.


0 Comments