google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र 'या' युवकाने पुश-अप्सचा केला नवा विश्वविक्रम

Breaking News

सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र 'या' युवकाने पुश-अप्सचा केला नवा विश्वविक्रम

सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र 'या' युवकाने पुश-अप्सचा केला नवा विश्वविक्रम


शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२

सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र संजय देवकाते यांनी एका मिनिटात मोस्ट नकल पुश अप्सचा नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे. 

त्यांनी एका मिनिटात १२१ नकल - पुश अप्स मारून ११८ नकल पुश अप्सचा पूर्वीचा विक्रम मोडला आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

संजय देवकाते हे भारतीय नौसेनेत हवालदार म्हणून गेल्या सहा वर्षापासून कार्यरत आहेत. मुंबई येथे हा विश्वविक्रम उपक्रम संपन्न झाला.

 त्यानंतर इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड समितीने सदर निर्णय ५ एप्रिल २०२४ जाहीर केला असून त्यांच्या या विश्वविक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.

 विश्वविक्रमाचा व्हिडिओ आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंडवर शेर केला आहे .त्यामुळे हवालदार संजय देवकाते यांच्यावर संपूर्ण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

देशाचं नाव इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये न्यायचं स्वप्न होतं. त्यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर ते स्वप्न पूर्ण झाल्यानं आनंद होत आहे. 

त्यामुळे मला या विश्वविक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, अशा भावना संजय देवकाते यांनी विश्वविक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्यानंतर बोलताना व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments