मतं आमची आणि मक्तेदारी प्रस्थपित नेत्यांची आता शक्य नाही :- सुरजदादा बनसोडे
माढा लोकसभा मतदार संघात चाललेलं राजकीय नाट्य अजून म्हणावं तस स्पष्ट मिटलेलं दिसत नाही आत्ता पर्यंत इच्छुक उमेदवार सांगोला तालुक्यात दौऱ्यासाठी आले की पाटील
किव्हा देशमुख यांना बरोबर घेऊन प्रस्थापित नेते किव्हा पुढारी यांच्याच गाठी भेटी घेत आहेत मराठा किंवा धनगर समाजाची नेतेमंडळी व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या घरी भेटी घेत आहेत.
वास्तविक पाहता सांगोला तालुक्यात माढा मतदार संघात इतर समाजाची मते आहेत का नाहीत उदा :- दलित , मुस्लिम , भटके विमुक्त , अल्पसंख्यांक या समाजाचे नेते पदाधिकारी व
कार्यकर्ते यांच्या गाटी भेटी घेऊन चर्चा करताना दिसत नाहीत , ह्याचा अर्थ या प्रस्थपित नेत्यांनी या समाजाला गृहीत धरून ह्यांची मालकी व मक्तेदारी घेतली आहे असे चित्र तालुक्यात
तयार करून राजकीय पक्षांना व उमेदवारांना भासवून दिले आहे सांगोला तालुक्यात आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून गेली 25 वर्ष सर्वसामान्य गोरगरीब सर्वसामाजातील
जनतेची कामे निस्वार्थी पणे अविरत केली आहेत त्या अनुषंगाने सर्व जाती धर्माच्या लोकांशी नाळ जोडली गेली आहे आता पर्यंत लोकांच्या अडी अडचणी , अत्याचार न्याय हक्कासाठी
महाराष्ट्र व देशभर घडलेल्या वाईट गोष्टीवर सर्वात जास्त मोर्चे काढून निवेदन देऊन आंदोलने केली आहेत सांगोला तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत योग्य भूमिका घेऊन दखलपात्र भूमिका केली आहे ,
लोकसभा ही निवडणूक विधानसभे पेक्षा खूप महत्त्वाची व गांभीर्याने घेण्याची आहे कारण लोकसभेमध्ये देशातील जनतेच्या हिताचे निर्णय होत असतात म्हणून लोकसभेत
योग्य उमेदवार व कोणत्या पक्षाचा असावा हे महत्वाचे असते परंतु मतदार संघातील पाटील देशमुख आपल्या राजकीय व आर्थिक फायद्यासाठी कोणत्याही उमेदवाराकडून उचली घेऊन
इतर समाजाची मक्तेदारी घेतल्याच्या अविर्भावात आहेत अशा नेत्यांची दुकानदारी ह्या निवडणुकीत चालू देणार नाही असे मत रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया चे
संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी व्यक्त केले माढा लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून भूमिका लवकरच स्पष्ट होईल
0 Comments