सांगोला शहरात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भिमशक्ती संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सांगोला येथे बैठक संपन्न..
जो पक्ष सन्मानपूर्वक वागणूक देईल त्या पक्षाला भीमशक्ती संघटना पाठिंबा देईल संस्थापक अध्यक्ष मा. विजय बापू बनसोडे
शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे
सांगोला प्रतिनिधी:-लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या आहेत प्राचाराची रण धुमाळी चालू झाली आहे.
त्या अनुषंगाने भिमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भिमशक्ती संघटना कार्यालय सांगोला येथे सोमवार दिनांक 15/4 /2024 रोजी 11वाजता बैठक झाली.
ती बैठक भिमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजयबापू बनसोडे तालुका अध्यक्ष संतोष साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
त्यावेळी भिमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजयबापू बनसोडे बोलताना म्हणाले समाजातील शोषित, पिढीत ,वंचित, उपेक्षित
भटक्या विमुक्त अल्पसंख्यांक मागासवर्गीय बेरोजगार शेतकरी कष्टकरी कामगार घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी गेले पंचवीस वर्षे संघटना काम करत आहे .
व आमच्या संघटनेच्या राजकीय पटलावरती आमच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा जो पक्ष विचार करेल त्यांच्यासोबत लोकसभा व इतर निवडणुकीत काम करण्याचा विचार व्यक्त केला.
यावेळी प्रमुख उपस्थित सुभाष गायकवाड, महेंद्र दोडके, सुनील भडकुंबे, महेश बनसोडे, गणेश बनसोडे, सागर बनसोडे,
प्रमोद बनसोडे, जॉकी कांबळे ,औदुंबर बनसोडे, समीर चंदनशिवे ,युवराज माने ,बबन चव्हाण ,संतोष साठे, अँड .प्रफुल्ल उबाळे,
दिनेश धनवडे, सुधाकर जगधने, विकास काटे ,अतुल होवाळ, दादासाहेब शिरसागर, नितीन गायकवाड,भिमशक्ती संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments