google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ! अमेरिकेतून काही महिन्यांपूर्वी भारतात आली, 4 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

Breaking News

धक्कादायक ! अमेरिकेतून काही महिन्यांपूर्वी भारतात आली, 4 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

अमेरिकेतून भारतात आली, 4 वर्षांच्या मुलाला कडेवर घेतलं अन् 9 व्या मजल्यावरून उडी मारली, पुण्यातील थरारक घटना


पिंपरी- चिंचवड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षीय चिमुकल्यासह आईने आपलं जीवन संपवलं आहे. 

ही घटना शहरात वाकड भागात घडली आहे, मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या कोमल औटे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 

कोमल आवटे या त्यांच्या पतीसह अमेरिकेत राहत होत्या. नुकतच पाच एप्रिल रोजी त्या पिंपरी- चिंचवड शहरातील रिगालिया सोसायटीत राहण्यास आल्या.

 कोमल मानसिक आजाराने ग्रस्त होत्या, अमेरिका आणि भारतात त्यांच्यावर उपचार सुरू होते, अखेर या आजाराने चार वर्षीय मुलाचा जीव घेण्यास भाग पाडले, 

आई कोमल ने स्वतः मुलासह इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलीय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

कोमल जगदीश हरिश्चंद्रे (वय ३२) आणि विहान संकेत आवटे (वय 4) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कोमल आणि संकेत आवटे यांंचं 2018 मध्ये लग्न झालं होतं.

 त्यानंतर दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर कोमल यांना मानसिक आजार सुरु झाला. त्यानंतर या मानसिक आजाराने जास्तच त्रस्त झाली.

 त्यानंतर कोमल हिच्या मनात भीती निर्माण झाली होती. माझ्या मुलाला कोणी मारेल आणि मलाही मारुन टाकेन, माझ्या मागे भूत लागलं आहे, असं त्या म्हणत होत्या. त्यानंतर त्यांच्यावर अमोरिकेत उपचारदेखील सुरु झाले.

 उपचार सुरुच होते. मात्र मानसिक त्रास अति सुरु झाला. त्यामुळे त्या भारतात आल्या. दोन दिवसांपूर्वी त्या भारतात घरी परतल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येणार होते. 

त्यासाठी डॉक्टरांची वेळदेखील घेण्यात आली. उपचार घेण्यासाठी वाकडमधील एका सोसायटीत राहायला आले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सासू-सारसेदेखील आले होते.

यावेळी दोघांच्या कुटुंबियांना कोमलच्या आजाराची भीती वाटू लागली. तिच्यावर उपचार कधी होणार?, 

याची वाट पाहू लागले होते. रात्री सगळे झोपले आणि पहाटेच्या सुमारास विहानला कडेवर घेतलं आणि थेट 9व्या मजल्यावरुन उडी मारली. 

यानंतर पहाटेच मोठा आवाज झाल्याचं पाहून वॉचमनने पाहिलं असता. तो घाबरला आणि घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर घरच्यांनी पोलिसांनादेखील माहिती दिली. मात्र या दरम्यान तिचा मृत्यू झाला. 

Post a Comment

0 Comments