खळबळजनक...डोळ्यासमोर पोटच्या मुलीची हत्या ! आईने आरोपीचा जीव जाईपर्यंत दगडाने ठेचून घेतला बदला
उद्यानात कोणालातरी भेटायला जात असल्याचे मुलीच्या आईला सांगितले. आईला संशय आला आणि ती आपल्या मुलीच्या मागे लागली.
यावेळी आरोपी सुरेशने उद्यानातच मुलीची हत्या केली. मुलीला वाचवण्यासाठी आई धावली आणि सुरेशवर दगडाने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
देशभरात गुन्हांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दोन-तीन दिवसापुर्वी कर्नाटकातील हुबळी येथे कॉलेज कॅम्पसमध्ये एका आमदाराच्या मुलीची तिच्या प्रियकरानं हत्या
केल्याची घटना घडली या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आता पुन्हा कर्नाटक डबल मर्डरच्या घटनेनं हादरलं आहे.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे प्रियकराने सोबत राहण्यास नकार देण्याऱ्या प्रेयसीची हत्या केली.
ही हत्या होत असताना तरुणीच्या आईने पाहिलं. यानंतर तरुणीच्या आईने रागाच्या भरात मुलीच्या प्रियकराची हत्या केली. जेपी नगर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सारक्कीजवळील उद्यानात खुनाची ही घटना घडली. प्रियकर आणि प्रेयसीच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली.
मृत प्रियकर सुरेश हा शहरातील गोरगुंटे पाल्याचा रहिवासी होता. तर प्रेयसी अनुषा शांकंबरी नगर येथील रहिवासी होती. प्रियकर आधीच विवाहित होता.
गेल्या पाच वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये काही कारणावरुन भांडण झालं. रागाच्या भरात प्रियकाराने प्रेयसिचा खून केला. मुलीची हत्या होताना आईने पाहिलं.
तिने तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर दगड विटाने वार करत त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून सुरू केला आहे.
पाच वर्षांपासून होते प्रेमसंबंध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश आणि अनुषा यांचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यापैकी सुरेशचे आधीच लग्न झाले होते.
दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. अचानक अनुषाने सुरेशसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्यास नकार दिला.
सुरेशने त्याला सारक्कीजवळील उद्यानात बोलावले. तिच्यासोबत अनुषाची आई गीताही आली होती. दोघांमध्ये चर्चा सुरू होती. सुरेशने अनुषाला एकत्र राहण्यासाठी खूप पटवून दिले होते.
अनुषाने सुरेशसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे तो संतप्त झाला. त्याने अनुषावर चाकूने हल्ला केला.
धारदार चाकूने हल्ला केल्याने अनुषाचा मृत्यू झाला. हे पाहून अनुषाची आई गीता यांनी सुरेशच्या डोक्यात सिमेंटच्या विटाने वार केले.
डोक्याला वीट लागल्याने तो खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. हत्येची माहिती मिळताच पोलीसही दाखल झाले. पोलिसांनी गीताला ताब्यात घेतले.
आईने प्रियकराचा विटेने वार करून केला खून
डोळ्यासमोर मुलीची हत्या होताना दिसताना आईने घटनास्थळी धाव घेतली. तिने सुरेशला थांबवण्यासाठी मध्यस्थी केली, तरीही सुरेशने अनुषावर चाकूने वार केले.
त्यानंतर आईने सिमेंटची वीट उचलून सुरेशच्या डोक्यात मारली. यामुळे सुरेशचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या जेपी नगर पोलिसांनी अनुषाची आई गीता हिला ताब्यात घेतले आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments