सोलापूर, शिर्डी रिपाइंला न सोडल्यास वेगळा विचार RPI तालुका अध्यक्ष मा.खंडू सातपुते यांचा इशारा:
दोन्ही मतदारसंघात पक्षाचा मोठा जनाधार
सांगोला/प्रतिनिधी : (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी व सोलापूर लोकसभा मतदारसंघ सोडले पाहिजेत. तसे न केल्यास वेगळा विचार करणार असल्याचा इशारा रिपाइं (आठवले गट) सांगोला तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी दिला आहे.
शिर्डी मतदारसंघात रिपाइंचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे लढण्यास इच्छुक आहेत. ही जागा रिपब्लिकन पक्षाला महायुतीने दिली पाहिजे. तसेच सोलापूर
लोकसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष व महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे हे लढण्यास इच्छु क आहेत. त्यामुळे या दोन्ही जागा महायुतीने रिपाइंला सोडाव्यात
ही महाराष्ट्रातील तमाम रिपाइं कार्यकर्त्यांची मागणी आहे. किमान १० वर्षापासून रिपाइं भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा शब्द प्रमाण मानून युतीचा धर्म पाळुन
महायुतीचे काम करीत आहे.
शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ हे रिपाइंला सोडले पाहिजेत. या मतदार संघामध्ये रिपाइंची ताकत मोठ्या प्रमाणात आहे.
दोन्ही मतदारसंघ रिपाइंला सोडवून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न चालू आहेत. परंतु दोन्ही जागा न सुटल्यास रिपब्लिकन पक्षाला वेगळा विचार करावा लागेल.
जोपर्यंत रिपाइं प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी अधिकृत केल्याशिवाय पदाधिकाऱ्यांनी कोणतीही भुमिका घेऊ नये, असे रिपाइं सांगोला तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी सांगितले.
चौकट
अधिकृत मागणी महायुतीकडे
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिर्डी आणि सोलापूर हे लोकसभेचे दोन मतदारसंघ रिपाइंला देण्यात यावेत अशी अधिकृत मागणी महायुतीकडे केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा नामदार रामदास आठवले यांनी २५ फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील संविधान सन्मान मेळाव्यामध्ये जाहीर भाषणात याचा उल्लेख केला आहे.
- खंडू सातपुते, तालुकाध्यक्ष रिपाइं (आठवले) सांगोला तालुका
0 Comments